वाशिम जिल्हा पोलीस दलामध्ये कर्तव्य बजावून नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांचा सत्कार सोहळा व सेवानिवृत्ती समारंभ पोलीस अधीक्षक कार्यालय, वाशिम येथील सभागृहात मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधिकारी व अंमलदार/कुटुंबियांच्या साक्षीने पार पडला.
पो.स्टे.धनज येथे कर्तव्यास असलेले पोलीस उप-निरीक्षक श्री.रमेश सुदामा गलांडे, पो.स्टे.कारंजा ग्रामीण येथे कर्तव्यास असलेले सपोउपनि.उत्तम श्रीराम गोलाम, पो.स्टे.जऊळका येथे कर्तव्यास असलेले सपोउपनि.राजेंद्र जगन्नाथ गोदारा, पो.स्टे.वाशिम शहर येथे कर्तव्यास असलेले सपोउपनि.माधव भिकाजी जमधाडे, पो.स्टे.वाशिम ग्रामीण येथे कर्तव्यास असलेले सपोउपनि.नंदकुमार भाऊराव सरनाईक व नागरी हक्क संरक्षण येथे कर्तव्यास असलेले पोहवा.शालिकराम दत्तुजी झाटे हे सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार दि.३०.०४.२०२३ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.
त्यानिमित्ताने आयोजित सेवानिवृत्ती कार्यक्रमात मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांनी सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांचा शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार केला व पुढील निरोगी व समृद्ध आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांनी आपल्या मनोगतातून कर्तव्य काळातील आपले अनुभव व्यक्त केले.
यावेळी वाशिम जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांनी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी/अंमलदारांचे अभिनंदन करत त्यांना पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रम पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मेहनत घेत यशस्वीरीत्या पार पाडला.
0 Comments