वाशिम : बालविवाह करणे कायदयाने गुन्हा असतांना वाशिम जिल्हयात बालविवाहाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून
मानोरा तालुक्यातील फुलउमरी (सोमेश्वर नगर) येथे १७ जून रोजी १४ वर्षिय मुलीचा व रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह १८ जून रोजी प्रशासनाच्या खबरदारीने रोखल्या गेला. तेव्हापासून प्रशासनाने कठोर पावली उचलली आहेत बाल कल्याण विभागाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी जनजागृती अभियान सुद्धा राबवण्यात आले आहे. कायदा कुणाची काय करणार नाही कृत्य करणाऱ्या विरोधात कायद्यात मोठ्या प्रमाणात तरतुदी केली आहे
१८ वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या पुरुषाने बालवधुशी विवाह केल्यास त्या पुरुषाला दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि एक लाखपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तसेच जाणीवपूर्वक बालविवाह घडवून आणणाऱ्या, त्यासाठीचा किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.बालविवाह झाल्यास, संबंधित वर वा वधू यांचे आईवडील किंवा पालक, अन्य नातेवाईक मित्र परिवार असे सर्व, ज्यांनी हा विवाह घडविण्यास प्रत्यक्षात मदत केली किंवा तो न होण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, वा जे अशा विवाहात सामील झाले होते अशा सर्वांना दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद व एक लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो.
सोहळा पार पाडणाऱ्यास किंवा प्रोत्साहन देणाऱ्यास दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि एक लाखपर्यंत दंड
असे असताना अशा घटना जिल्ह्यात घडल्या जात असतील तर याला जबाबदार कोण . अशा प्रकरणात सामील असणाऱ्या च्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी चर्चा वाशिम जिल्ह्याच्या राष्ट्रवादीच्या महिला कार्याध्यक्ष ज्योतीताई ठाकरे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्याशी केली आहे. लवकरच जिल्ह्यात ग्रामीण भागात विविध ठिकाणी जनजागृती अभियानाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू केले जाईल
0 Comments