वाशिम - नुकत्याच झालेल्या वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी अडते मतदार संघातून निवडून आलेले नवनिर्वाचित संचालक सुरेश भोयर यांचा सोमवार, १ मे रोजी व्यापारी वर्ग व बाळसमुद्र प्रतिष्ठानच्या वतीने भावपुर्ण सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी आमदार पुरुषोत्तम राजगुरु, विद्याभारतीचे जिल्हाध्यक्ष प्रा. दिलीप जोशी, योग प्रशिक्षक डॉ. भगवंतराव वानखेडे, सुनिल व्यवहारे, चंद्रकांत व्यवहारे, सांभाप्पा सदावर्ते, फकीरा सुरजुसे, सुभाष व्यवहारे, नामदेवराव धोटे, हिंदवी परिवाराचे दिलीप मेसरे, दिपक व्यवहारे, जयेश आंबटपुरे आदींनी संचालक सुरेश भोयर यांचा गुलाल लावून व पुष्पहार घालून सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बाळसमुद्र प्रतिष्ठान व मित्रमंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
0 Comments