Ticker

6/recent/ticker-posts

माझ्यासारखी मीच’ कार्यक्रमातून डिजीटल सहेली होण्याचा महिलांचा संकल्प महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचा पुढाकार जिल्हयातील एमएससीआयटी सेंटर संचालकांच्या पत्नींचा सहभाग

वाशिम - महिलांचा उद्योग व्यवसायात आत्मविश्वास वाढावा, माहिती तंत्रज्ञान कौशल्य व डिजीटल व्यवहार हाताळता यावा, संवाद क्षमता वाढावी या उद्देशाने महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या पुढाकारातून शुक्रवार, २८ एप्रिल रोजी स्थानिक हॉटेल इव्हेंटो येथे जिल्हाभरातील एमएससीआयटी सेंटर संचालकांच्या पत्नींसाठी ‘माझ्यासारखी मीच’ या वैशिष्ट्यपुर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

    या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून एमकेसीएलच्या संवादक सुप्रिया माणगांवकर व विभागीय व्यवस्थापिका दया कटरे आल्या होत्या.यांच्यासह जिल्हा समन्वयक नरेश खंडारे, शंकर पातळे, प्रशांत भगत यांची उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करतांना सुप्रिया माणगांवकर यांनी स्त्रियांनी आपले भावनिक आरोग्य कसे ठेवावे आणि स्वत:च्या व्यवसायात आपल्या जोडीदाराला भावनिक आधार देवून आपली आर्थिक स्थिती कशी मजबुत करता येईल याविषयी मार्गदर्शन केले. तसेच दया कटरे यांनी डिजीटल सहेलीच्या माध्यमातून आजच्या युगात स्त्रियांनी स्वयंपुर्ण कसे व्हावे तसेच व्यवसायात आपल्या जोडीदाराला पाठींबा देवून विद्यार्थीनींची संख्या कशी वाढविता येईल याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमात सहभागी प्रत्येक महिलेला व्यासपिठावर बोलावून त्यांना संवाद साधण्याची संधी देण्यात आली. आजपर्यंत घरसंसार चालवित असतांना आपला जोडीदार एमएससीआयटी सेंटर चालवित आहे एवढेच माहित होते. परंतु या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हालाही या व्यवसायात काम करण्याची रूची निर्माण झाली असून आम्हाला एक नवी उर्जा मिळाली आहे. यापुढे आम्ही आमच्या जोडीदाराला एमसीआयटी व क्लिक बिझनेस वाढीसाठी मदत करणार असल्याचे मत महिलांनी व्यक्त केले. महिलांनी मोबाईल व डीजीटल व्यवहाराच्या माध्यमातून आपल्या घरचे लहानमोठे देणे कॅशलेस पध्दतीने चुकवावे यासोबतच विविध खरेदी ऑनलाईन पध्दतीने घरच्या घरी कशी करता येईल याविषयी सुप्रिया माणगांवकर व दया कटरे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला जिल्हाभरातील एमएससीआयटी सेंटर संचालकांच्या पत्नींची बहूसंख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments