Ticker

6/recent/ticker-posts

तीन रायफल शूटर्सची प्री-नॅशनल रायफल स्पर्धेकरीता निवडवाशिम रायफल शुटींग क्लबचे परिश्रम : ११ वर्षीय धृ्रवचा सहभाग


वाशिम - नागपूर येथे २७ ते ३० एप्रिल दरम्यान नागपूर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र एअर गन कॉम्पिटीशच्या स्पर्धेचा १२ मे रोजी लागलेल्या निकालात वाशिम रायफल शुटींग क्लबच्या तीन रायफल शूटर्सनी चमकदार यश मिळवत नॅशनल रायफल शुटींग स्पर्धेत मुसंडी मारली. पुढील महिन्यात होणार्‍या या स्पर्धेकरीता ११ वर्षीय धृ्रव प्रल्हाद आळणे याच्यासह पियुष श्याम घोडके व दिव्या सुरज खडसे या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
    या खेळाडूंपैकी ध्रृव सर्वात लहान खेळाडू असून पियुष व दिव्या या खेळाडूंनी केवळ दीड महिन्यात सरावातच नागपूर येथील स्पर्धेत घवघवीत यश मिळविले. या तीनही खेळाडूंचे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रातून कौतूक होत आहे. या यशाबद्दल विजयी खेळाडूंचा वाशिम जिल्हा रायफल शुटींग असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप हेडा व सचिव निशा शिवणकर तसेच वाशिम रायफल क्लबचे सचिव प्रल्हाद गं. आळणे, उपाध्यक्ष वैशाली निवलकर, सागर निवलकर, राष्ट्रीय रायफल शूटर रूषभ ढवळे, सदस्य सागर आळणे, छाया आळणे यांनी सत्कार केला. या खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती लता गुप्ता व महाराष्ट्र रायफल शुटींग असोसिएशनच्या सदस्या व राष्ट्रीय कोच श्रद्धा नल्लमवार यांचे मार्गदर्शन लाभले. आपल्या यशाचे श्रेय या खेळाडूंनी जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता, नॅशनल फेलोशिप प्राप्त प्रतिक बाराहाते, तालुका क्रीडा अधिकारी सोनकांबळे, बालाजी शिर्शिकर, किशोर बोंडे, फुफाटे, वाशिम रायफल शुटींग असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप हेडा, उपाध्यक्ष अनिल बोंडे, सचिव निशा शिवणकर, सुनिल ुव्यवहारे, सुनिल पाटील, वैशाली निवलकर, सागर आळणे, संतोष आळणे, महादेव तूर्के, सागर निवलकर, नॅशनल रायफल शुटर क्षितिज कैलास राऊत, रुपाली घोडके, आशा खडसे व निशा आळणे, श्याम घोडके, सूरज खडसे, प्रल्हाद आळणे तसेच प्रशिक्षक प्रल्हाद आळणे यांना दिले आहे.

Post a Comment

0 Comments