एका इन्स्टाग्राम पोस्टमुळे अकोल्यात मध्यरात्री दंगल उसळली होती. पोलिसांनी मोठ्या शितापीने परिस्थिती आटोक्यात आणली खरी, परंतु या दंगलखोरांनी जुन्या शहर भागात अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळ केली आहे. यात आतापर्यंत १० दंगलखोर आणि दोन पोलीस जखमी झाले आहेत. शहरातील हरिहरपेठमध्ये मध्यरात्री दोन गटांमध्ये मोठा राडा झाला. या राड्यात अनेक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली आहे. दंगलखोरांनी अनेक दुचाकी, चारचाकी वाहनं पेटवली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी अग्निशमन दलाच्या वाहनांची देखील तोडफोड केली आहे. या दंगलीनंतर अकोला शहरातील अनेक भागांमध्ये कलम १४४ अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दंगलखोरांनी पोलीस ठाण्याबाहेरही दगडफेक केल्याची माहिती मिळाली आहे.इन्स्टाग्रामवर एका व्यक्तीने वादग्रस्त पोस्ट शेअर केल्यामुळे आधी भांडण आणि दोन गटांमध्ये राडा झाला. त्यानंतर पोलीस या प्रकरणी गुन्हा दाखल करत होते. त्याचवेळी पोलीस ठाण्याबाहेर दगडफेक सुरू झाली. गर्दी पांगवण्यासाठी पोलीस बाहेर पडले. परंतु तोवर दंगलखोरानी जाळपोळ सुरू केली होती. त्यानंतर पोलिसांना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अधिक पोलीसफाटा मागवावा लागला. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या सोडाव्या लागल्या.दरम्यान, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने सांगितलं की, अकोल्यातील घटनेबाबत ते काल रात्रीपासून डीजीपी आणि अकोला पोलिसांच्या संपर्कात होते. आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून परिसरात शांतता आहे. आतापर्यंत सुमारे ३० आरोपींना अटक करण्यात आली असून घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अफवा वर विश्वास ठेऊ नये असेही पोलिस प्रशासनाने सांगीतले
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments