Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून धानोरकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यांचा अनावरण सोहळा . महात्मा गांधी आश्रम , सेवाग्रामच्या श्रीमती कुसुमताई पांडे यांच्या शुभहस्ते संपन्न

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आणि
 स्वातंत्र्य संग्राम सेनानी कर्मवीर कॅप्टन तथा संस्थापक अध्यक्ष स्व. सुदामराव धानोरकर गुरुजी यांच्या पुण्यतिथी निमित्त 
स्व.कर्मवीर कॅप्टन स्व.सुदामराव सटवाजीराव धानोरकर व संस्थेचे माजी सचिव तथा प्राचार्य स्व. नानासाहेब सुदामराव धानोरकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यांचा  अनावरण सोहळा . 




रयतेची राजे स्वराज्य मिळवून देणारे छत्रपती शिवाजी महाराज. आम्हाला समता शिकविणारे महात्मा ज्योतिबा फुले ,  संघर्षाचे बाळकडू देणारे राजश्री शाहु महाराज,लढवय्ये टिळक , डॉ. बाबासाहेब आंबेडकर, श्री संत सेवालाल महाराज, आम्हा ग्रामीण भागातील जनतेला ग्राम गीतेचे पाठ देणारे 'ग्रामगीताकार' वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत गाडगेबाबा अशा या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेल्या व महाराष्ट्रासाठी आपलं सर्वस्व अर्पण करणाऱ्या महान महापुरुषांना विनम्र अभिवादन  आजच्या या 'पुतळ्यांच्या अनावरण सोहळ्यासाठी' आवर्जुन उपस्थित असलेले  मान्यवर 
आजच्या पुतळा अनावरण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मा.श्री.बाबुरावजी धानोरकर यांनी स्वीकारले होते.
तसेच आजच्या सोहळ्याच्या महत्वपूर्ण प्रसंगी उपस्थित असलेल्या व ज्यांच्या शुभहस्ते अर्धाकृती पुतळ्यांचे अनावरण होऊ घातले आहे अशा महात्मा गांधी आश्रम , 
 सेवाग्रामच्या तथा संस्थेच्या कार्यकारणीतील सदस्या श्रीमती कुसुमताई पांडे  तसेच ज्यांच्या विशेष उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होतो आहे अशा संस्थेच्या कोषाध्यक्षा तथा माजी प्राचार्या श्रीमती रजनीताई धानोरकर  तसेच संस्थेच्या सदस्या  सौ. अंजलीताई चौधरी ,दिनकरराव चौधरी, माई खंडेश्वर, गजाननराव खंडेश्वर,सौ. स्वातीताई भांडे ,श्रीमती निर्मलाताई धानोरकर , श्रीमती आशाताई खोटरे , जनार्दनजी पाटील मगर, वैराळे गुरुजी, फरकाळे मामा,अभयकाका पांडे,प्रकाशराव नायक,शिवाजी शिक्षण संस्थेचे संचालक अमरावती श्री सुरेशदादा खोटरे, श्री मधुसुदन खोटरे, सतिशजी केचे,श्री.किशोरराव भांडे , जाधव सर, रमेशराव वानखडे, पुष्पाताई धानोरकर' संजीवनी ताई नायक' संगीता ताई घोडमारे, अपर्णाताई चौधरी, जयंतजी गोहाड, बाबासाहेब निस्ताने सौ.वानखडे मॅडम, श्रीमती छायाताई वाटाणे, ऍड. रमेशराव पाटील, श्री प्रशांत भाऊ वानखडे, श्री पुंड सर,श्री. सुरेशभाऊ लुंगे,दिलीपभाऊ मोहनावाले,अनंता काळे,प्रवीण ठाकरे,सचिन परळीकर,राऊत काका, पी.डी. शिंदे काका, वसंता डी.शिंदे उपस्थित होते.
श्री धानोरकर आधुनिक ग्रामजीवन शिक्षण प्रसारक मंडळ,
धानोरा (खुर्द) या शैक्षणिक संस्थेचे संस्थापक तथा स्वातंत्र्य संग्राम सेनानी कर्मवीर कॅप्टन स्वर्गीय
सुदामरावजी धानोरकर गुरुजी यांनी खेड्यापाड्यातील गोर-गरीब जनतेच्या मुला-मुलींना शिक्षण घेता यावे, याच तळमळीतून धानोरा खुर्द या छोट्याशा गावी सन 1966 साली विजयादशमीच्या मुहूर्तावर या संस्थेची स्थापना केली होती. या शैक्षणीक संस्थेची स्थापना करून ग्रामीण भागातील मुला-मुलींच्या शिक्षणाची सोय करण्याच्या उदात्त हेतूने मुहूर्तमेढ रोवलेल्या या संस्थेचे आता मात्र विशाल अशा वटवृक्षांमध्ये रूपांतर झालेले आहे;
व पंचक्रोशीत शाळेचे नावलौकीक आहे. हे सांगताना संस्थेचा- अभिमान वाटतो २० फेब्रुवारी 1968 रोजी वंदनीय राष्ट्रसंतांनी संस्थेला प्रत्यक्ष भेट देऊन महाराजांच्या पावन पदस्पर्शाने ही संस्था पुनीत झालेली आहे. महात्मा गांधी, विनोबाजी भावे आणि वंदनीय राष्ट्रसंतांच्या तत्त्वांचा व विचारांचा वारसा संस्थेला पूर्वीपासूनच लाभल्याने  संस्थेचा विजयवारू संस्थेच्या स्थापनेपासुन आजपर्यंतही यशाचा पल्ला गाठत आलेला आहे. हे या ठिकाणी अभिमानाने सांगावेसे वाटते.
आपल्या गावालाच स्वर्गीय कॅप्टन सुदामरावजी धानोरकर गुरुजी यांनी आपले दैवत मानले होते,
त्यामुळे केवळ शैक्षणिक संस्थाच नव्हे, तर गावाच्या परिसरातील लोकांच्या सोयींसाठी 1972 मध्ये या गावात पोष्ट मिळविण्यासाठी त्यांनी शासनाकडे पाठपुरावा करून तशी मागणी केली होती व त्यानुसार धानोरा सारख्या छोट्याशा गावामध्ये त्यावेळी पोस्ट ऑफिस देखील त्यांच्या पुढाकाराने सुरु झाले . ग्रामीण भागातील मुला मुलींना कुस्ती शिकवणे , सुट्टीच्या दिवशी ग्राम स्वच्छता अभियान ,विद्यार्थ्यांना कशी शिस्त असावी अशाप्रकारे त्यांनी  ग्रामसेवेच्या आपल्या व्रताला आरंभ केला होता. जिल्हा मध्यवर्ती बँकेला आपली जागा दान देऊन 1985 मध्ये धानोरा (खुर्द) या छोट्याशा गावामध्ये सहकारी बँकेची शाखा सुरु केली. केवळ बौद्धिक शिक्षणातूनच व्यक्तिचा सर्वांगीण विकास साध्य होत नसतो, तर कृतीयुक्त शिक्षणाची जोड मिळाली तर ग्रामीण भागातील विद्यार्थी लवकरात लवकर स्वयंपूर्ण बनु शकेल, हे ओळखून संस्थेचे तत्कालिन सचिव व माजी प्राचार्य स्वर्गीय नानासाहेब धानोरकर साहेबांनी - 1991-92 मध्ये किमान कौशल्यावर आधारित व्यावसायिक अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू करून वंदनीय राष्ट्रसंतांची उच्च शिक्षणाच्या संदर्भातील शैक्षणिक कल्पना सत्यात उतरविण्याचे कार्य केले.
'इवलेसे रोप लावीयले व्दारी, त्याचा वेलू गेला गगनावरी ,  तेव्हा याप्रमाणेच त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळेच आज धानोरा या छोट्याशा गावात कॉन्टेंट - पासून तर उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक ... कला, विज्ञान, एच. एस. व्हि.सी. शाखेपर्यंत शिक्षणाची सोय  उपलब्ध झालेली आहे. असे आपल्या पित्याप्रमाणेच ते कर्मयोगी  शिक्षकदुत व शिक्षणप्रेमी होते.

...ते म्हणत असत - "जीवनाचे नंदनवन करण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे परिश्रम कामात वेळ घालवा ती यशाची गुरुकिल्ली आहे 1967 पासून 2003 पर्यंत त्यांनी आपल्या संस्थेचे प्राचार्य पद भुषविले.





 राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेल्या ग्रामगितेतील ओवी माझ्या आयुष्यात कशी उतरवता येईल तसेच ग्रामगितेनुसार माझ्या गावाचा विकास कसा करता येईल असा त्यांचा ध्यास होता. हेच - त्यांचे ध्येय होते. स्वर्गीय नानासाहेब नेहमी गुणगुणायचे "" या कोवळ्या कळ्यांमाजी लोपले ज्ञानेश्वर, रविंद्र, शिवाजी ते वंदनीय महाराजांची प्रार्थना देखील तल्लीन होवून म्हणत असत. 




अशाप्रकारे आपल्या कर्तव्याप्रती कर्तव्यनिष्ठ ... असणाऱ्या कॅप्टन सुदामराव धानोरकर व स्वर्गीय नानासाहेब धानोरकर यांच्या  पुतळ्याचे शैक्षणीक संकुलामध्ये अनावरण करण्यात आले आहे.
संस्थेचे उपाध्यक्ष  डॉ. माणिकप्रभू धानोरकर,सौ. विनयाताई धानोरकर
 विद्यालयाचे प्राचार्य श्री  मंगेशभाऊ धानोरकर , सौ अंजलीताई धानोरकर हे विनीत होते.



आजच्या या 'पुतळ्यांच्या अनावरण सोहळ्यासाठी' आवर्जुन उपस्थित असलेले मान्यवरांचे  तसेच स्व.नामदेवरावजी बंधु वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुदेव सेवा भजनी मंडळ धानोरा खुर्द व समस्त धानोरा ग्रामवासी,गावकरी मंडळी व पंचक्रोशीतील प्रतिष्ठीत मंडळी,सर्व नातेवाईक,जावई, आप्तेष्ट, मंगेशभाऊ मित्र मंडळ, विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी  उपस्थित होते, विद्यार्थ्यांचे  शब्दसुमनाने स्वागत केले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव धानोरकर सर व प्रा.भोयर सर यांनी केले.







श्री धानोरकर आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आभार नकुल धानोरकर यांनी व्यक्त केले व लगेच स्नेहभोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments