Ticker

6/recent/ticker-posts

ज्योतीताई ठाकरेर राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ गौरव पुरस्काराने सन्मानित.



राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार वितरण सोहळा व भव्य महिला रोजगार मेळावा 
या कार्यक्रमात माजी राज्यमंत्री सुभाषरावजी ठाकरे साहेब उपस्थित होते.  वैशाली ताई मैश्राम वाशिम जिल्हा अध्यक्ष त्यांचा हस्ते निस्वार्थ समर्पित सामाजिक कार्याची दखल घेऊन सौ. ज्योती ताई मनोज ठाकरे वाशिम काय अध्यक्ष यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार 2023 देऊन सन्मानित करण्यात आले या वेळी डॉ.मोहीत मते पाटिल. श्रीकांत रोकडे.स्वपनिल मते.जीवन महल्ले.रुषीकेश जाधव व पुणं मते यांच्या उपस्थित सन्मान करण्यात आला.

माना विजया लक्ष्मण काळे फौंडेशन व मराठा समन्वय परिषद महाराष्ट्र, हिरकणी ग्रुप आयोजित राजमाता जिजाऊ पुरस्कार २०२३ सौ ज्योती ताई  ठाकरे यांना. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला दिला जातो. आपण आत्मविश्वासाने आणि जिद्दीने आपले ध्येय साध्य करीत आहात. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये खंबीरपणे उत्तुंग कामगिरी करून समाजासाठी काही तरी करण्यासाठी आपले बहुमुल्य योगदान देत आहात. याचा आम्हाला साथ अभिमान आहे. म्हणूनच जिजाऊंची लेक म्हणून या पुरस्कारासाठी आपली निवड करण्यात आली होती . आपणास हे सन्मानपत्र प्रदान करण्यात येत आहे .पुढिल कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा.
या कार्यक्रमाचे आयोजक मा. शिवमती अनिताताई लक्ष्मण काळे प्रभारी अध्यक्षा मराठा समन्वय परिषद महाराष्ट्र राज्य कार्यध्यक्षा मराठा समन्वय परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने इतरही मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. ज्योती ताई ठाकरेत्यांचे राजमाता जिजाऊ पुरस्काराबद्दल सर्वत्र कौतुक होत असून त्यांना अनेक सामाजिक संस्था संघटनेच्या वतीने शुभेच्छा दिल्या जात जयआहे.                  

Post a Comment

0 Comments