Ticker

6/recent/ticker-posts

सध्या उन्हाळा सुरू आहे की पावसाळा, असा प्रश्न जिल्हावासीयांना पडला आहे. गेल्या आठवडाभरापासून पावसाने जिल्ह्यात मुक्काम ठोकला आहे.

वाशीम : सध्या उन्हाळा सुरू आहे की पावसाळा, असा प्रश्न जिल्हावासीयांना पडला आहे. गेल्या आठवडाभरापासून पावसाने जिल्ह्यात मुक्काम ठोकला आहे. २ एप्रिल रोजी रात्री जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या ओसंडून वाहत आहेत.

गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. कधी मुसळधार, कधी गारपीट, कधी रिमझिम तर कधी विजेच्या कडकडटासह पावसाचा कहर सुरू आहे. मंगळवारी , रात्री वाशीम, मंगरूळपीर, मानोरा, मालेगाव , कारंजासह बहुतांश ठिकाणी दमदार पाऊस झाला. संततधार पावसामुळे आळान नदीला पूर आला परिसरातील नद्या मात्र तुंब भरल्या होत्या ,रुई गोस्ता येथील पूस नदीला पूर आला, तर अनेक भागातील छोट्यामोठ्या ओढ्या, नदी नाले ओसंडून वाहत आहेत. काही ठिकाणची रोड वाहून गेले तर काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले मंगरूळपीर तालुक्यातील पारवा ते लखमापूर येथील दृश्य डांबरासह रोड गेला बघून

या पावसामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले कित्येकांची जनावर व झाडावरल्या पक्षांना जीवनास मुखावे लागले.

मानोरा तालुक्यातील शेतकऱ्याची म्हैस गारपिटीने मृत्यू पडली


निसर्ग असाच कोपत राहिला तर जनसामान्यांचे काय होणार दोन वर्षे गेली कोरोनात आता वादळी वाऱ्यासह गारपीट निसर्गाचा धिंगाणा

Post a Comment

0 Comments