वाशिम दि ०१ जिल्ह्यातील विद्यार्थी व युवक -युवती यांना विविध क्षेत्रातील शिक्षणाच्या संधी तसेच रोजगार व स्वयंरोजगाराबाबत समुपदेशन करण्यासाठी ५ मे रोजी वाशिम येथील आरे महाविद्यालयात सकाळी १०.३० वाजता छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात करिअर प्रदर्शन राहणार असून विविध अभ्यासक्रम तसेच प्रवेश परीक्षांची सचित्र माहिती, इयत्ता १०वी नंतर करिअर कसे निवडावे,दहावीनंतर शिक्षणाच्या संधी, १२ वीनंतरचे अभ्यासक्रम,व्यक्तिमत्व विकास तसेच ऑनलाईन माहिती, आयटीआय अभ्यासक्रमाची माहिती इंजीनियरिंग व पॉलीटेक्निक अभ्यासक्रम,महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ,शैक्षणिक कर्ज व शिष्यवृत्तीची माहिती तसेच परदेशातील उच्च शिक्षणासंबंधी मार्गदर्शन या शिबिरातून करण्यात येणार आहे.तरी जिल्ह्यातील विद्यार्थी आणि युवा वर्गाने या शिबिराचा लाभ घ्यावा.असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.
0 Comments