Ticker

6/recent/ticker-posts

आदर्श ग्राम वनोजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुरु असलेले सिमेंट कामे निकृष्ट दर्जाचे...


अभियंत्याचे सदर कामाकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष,ठेकेदार व अभियंता याच्यांत साटेलोटे असल्याची
ग्रामस्थांमध्ये चर्चा.

वनोजा
मंगरूळपीर तालुक्यातील आदर्श ग्राम वनोजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सिमेंट काँक्रीट रोड तसेच अंतर्गत इमारत दुरुस्तीचे कामे चालू आहे. मात्र काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे होतांना दिसत आहे परंतु याकडे संबंधित अभियंता जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे यामध्ये कुठेतरी, पाणी मुरल्याची भावना सामान्य नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे.
संबंधित अभियंताला दूरध्वनीद्वारे कामाच्या गुणवत्तेबद्दल चौकशी केली असता, काम चांगले चालू असल्याचे सांगितले. कामात त्रुटी असेल तर ठेकेदाराकडून दुरुस्ती करून घेऊ असे सांगितले. परंतु कामांमध्ये कुठल्याही प्रकारची सुधारणा झालेली दिसत नाही. त्यामुळे संबंधित अभियंत्याला परत संपर्क केला असता प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे ठेकेदार व अभियंता यांच्या संगनमताने निकृष्ट दर्जाचे काम करण्यात येत असल्याचे दिसत आहे.
त्यामुळे सदर कामामुळे ठेकेदार-अभियंता मालपाणी मालामाल-प्राथमीक आरोग्य केंद्रांचे मात्र हाल होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
सदर ज्या ठिकाणी काम चालू आहे त्या ठिकाणी कामाचा तपशीलवार फलक लावणे अनिवार्य असूनही आज रोजी सदर कामे पुर्णत्वास येत असुनही माहीती फलक लावण्यात आलेले नाही. त्याच बरोबर सदर प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिसरात केलेल्या सिमेंट काँक्रीट रोडला आत्ताच भेगा पडत आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आत मध्ये करण्यात येत असलेले दुरुस्तीचे कामही निकृष्ट दर्जाचे करण्यात येत असल्याचे सर्वसामान्य नागरिकांन मध्ये बोलल्या जात आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधीत कामाची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून कामाच्या गुणवत्ता तपासुन गुणवत्तेबद्दल ताकीत देण्यात यावी ही मागणी करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments