Ticker

6/recent/ticker-posts

पालकांनो आपल्या मुलींकडे लक्ष द्या.... सामाजिक कार्यकर्त्या सौ.अश्विनीताई औताडे.

       
  जिव्हाळा फाउंडेशनचे अध्यक्षा 
         व समुपदेशक 
    सौ अश्विनी राम औताडे.


जिल्ह्यात मुली, महिला बेपत्ता, अपहरण, फूस पळवून नेल्या प्रकरणात २७८ गुन्ह्यांची नोंद झाली. यात १६७ गुन्ह्यांची पोलिसांसह अनैतिक मानवी वाहतूक कक्षाने उकल केली; परंतु, अद्यापही ३२ मुलींचा शोध घेण्याची गरज आहे.

 गेले काही दिवस झाले आपण बघत आहे की महाराष्ट्रातून गेल्या तीन महिन्यात म्हणजे जानेवारीपासून महाराष्ट्रातून मुली गायब होण्याचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे.  या मध्ये जी आकडेवारी दिली आहे ती धक्का करणारी आहे तसेच 16 ते 25 वयोगटातील मुलींचे प्रमाण यामध्ये जास्त आहे पण या  दोन्ही गोष्टी पेक्षा सगळ्यात महत्त्वाचा आहे की महाराष्ट्रातून म्हणजे आपल्या प्रत्येक जिल्ह्यातून मुली बेपत्ता होणे त्यामध्ये आपला वाशिम जिल्हा पण आहे.               पालकांनो जरा विचार करा की मुली घरामधूनच का निघून जात आहेत हा महत्त्वाचा प्रश्न आहे यामध्ये वेगवेगळी कारण आहेत   जसे की नोकरीचे आमिष,  लग्नाचे  आमिष, किंवा झटपट श्रीमंत होण्याची महत्वकांक्षा, life style, किंवा संगत गुण म्हणजे एका मुलीने काही केले तर दुसरी दुसरी मुलगी पण मागचा पुढचा विचार न करता ते करते म्हणजे तिला आपल्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य याचा विचार करण्याची क्षमता तिच्यामध्ये नसल्याने ती हे करते , कुठे कुठे  मुलींचे लैंगिक शोषण करण्यात येते त्यामुळे ती घाबरून हा निर्णय घेते,  कोणाला सांगायचे घरी आपलं  कोणी ऐकणार नाही या भीतीपोटी हे करते.  यावरून हे सिद्ध होते की आई वडील पालक वर्ग आपल्या मुलींकडे लक्ष  देण्यासाठी व त्यांना समजून घेण्यासाठी कुठेतरी कमी पडत आहे ‌. पालकांनो जागे व्हा,  सगळ्या पालकांनी आपल्या मुली सोबत मित्रासारखा वागाव आणि विशेष करून आईने त्यामुळे काय होईल मुलींच्या आयुष्यात जर काही गोष्टी बाहेर घडला तर ती लगेच अगोदर घरी सांगेन व त्यामधून काही ना काही मार्ग निघेल आणि तुमची मुलगी तुमच्या जवळच राहील. बाकीचे जेवढे काम आपल्यासाठी महत्त्वाचे असते तेवढ्येच महत्त्वाचे आहे की आपल्या मुलांचं आयुष्य घडवणं त्यापेक्षा पण. त्यामुळे प्रत्येक पालकांनी वेळी सावध होणे गरजेचे आहे अन्यथा अनर्थ होईल. आपली मुलगी चुकीच्या संगतीत तर पडली नाही ना किंवा तिला कोणी त्रास तर देत नाही न फक्त ती भीतीपोटी ती घरी सांगत नाही हे आपण बघितलं पाहिजे. सगळ्या गोष्टी मुलांनी तुम्हाला सांगितल्या पाहिजे त्यासाठी मुलांसोबत मुलींसोबत तुम्हाला तसं वागाव लागेल. घरात पण कुठल्याही गोष्टीची चर्चा चालू असताना मुलांना त्यामध्ये सहभागी करून घ्या त्यांच्या मताचा आदर करा त्यांचं मत त्यांना विचारा त्यामुळे काय होईल तुमची बॉण्डिंग खूप चांगली होईल आणि मुलांना विश्वास बसेल की आपले आई-वडील आपल्या सोबत आहेत. त्यामुळे बाहेर कोणीही त्यांना काही सांगितले तर ते ऐकणार नाहीत आणि तुम्हाला येऊन सगळ्या गोष्टी सांगतील. शिक्षणासोबतच त्यांना दुनियादारी शिकवा बाहेरच्या जगात आपला कोणी फायदा घेतला नाही पाहिजेत विशेष करून ह्या गोष्टी त्यांच्यासोबत राहून त्यांना पटवून द्या  त्यांना शिकवा की लोक आपल्या कामासाठी स्वार्थ साधण्यासाठी आपला कसा फायदा घेतात या जर गोष्टी त्यांना शिकवल्या तर नक्कीच त्या बाहेरच्या जगात फसल्या जाणार नाही कोणत्या मुलीला फसू देणार.  तुम्ही कितीही पैसे कमवले तर तुम्हाला कोणी विचारणार नाही तुम्ही किती कमवलं तर पण  तुमचे मुले व मुली काय करतात हे तुम्हाला भेटल्या भेटल्या नक्की विचारतील त्यामुळे  चला तर मग आपली पिढी घडवूया.... 
तीन वर्षांपासून ११६ मुली गायबगत तीन वर्षांची पोलिस विभागाच्या संकेतस्थळावरील माहितीची पडताळणी केली असता, जिल्ह्यात तीन वर्षामध्ये ३२५ च्यावर मुली, महिला, वृद्ध महिला बेपत्ता, अपहरणाची नोंद आहे. यापैकी काही मुली, महिला घरी परतल्या. पोलिसांनी शोध घेऊन त्यांना परत आणले; परंतु, अद्यापही जिल्ह्यातील ११६ मुली बेपत्ता असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

संपत्ती सोबतच आपली संतती घडवणं व तिला सुरक्षित ठेवणे हे आपल्याच हातात आहे. 

Post a Comment

0 Comments