मंगरूळ पीर (ता.प्र.)
मंगरूळपीर पंचायत समिती करिता भा.प्र.से.मिन्नू पी.एम.यांनी काल पंचायत समिती मंगरुळपीर येथे गटविकास अधिकारी मिन्नू पी.एम.मॅडम (भा.प्र.से. ) यांची नेमणूक करण्यात आली आहे.
या तरुण महिला अधिकारी असल्यामुळे मंगरूळपीर तालुक्यात यांच्या नावाची सर्व कडे चर्चा चालू आहे. वाशिम येथील अतिक्रमण काढण्यासाठी यांनी स्वतः पुढाकार घेऊन चांगल्या चांगल्या चे अतिक्रमण काढून रस्ता मोकळा केला आहे. अशाच कामाची मंगरूळपीर तालुका वाशी यांना यांच्याकडून अपेक्षा असून यांनी मंगरूळपीर तालुक्यातील अतिक्रमण मुक्त मंगरूळपीर तालुका करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे. तहसिलदार रवि राठोड, यांनी तालुक्यातील विकास कामासंबंधी मिन्नू मॅडम यांची भेट घेऊन मॅडमचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलेत. तसेच तालुक्यात फोपावत असलेल्या अतिक्रमण संबंधी काय उपाययोजना करता येईल यासंबंधी चर्चा केली. यावेळी बेलखेडे , शेलुबाजार येथील सामाजिक कार्यकर्ते बाबाराव पवार, नितीन लुंगे, ग्रामसेवक पिपंळकर, यांची उपस्थिती होती.
तसेच पत्रकार पवन राठी, मनोज राऊत यांनी मिंन्नु मॅडमची आज सदिच्छा भेट घेउन पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व तालुक्यातील अतिदुर्गम भागातील व काटेपुर्णा अभयारण्याच्या कुशित वसलेल्या रुई गावाच्या विकासाच्या विविध विषयावर चर्चा केली . या गावाच्या विकासाकरिता दोन दिवसात ग्रामस्थांची भेट घेऊन याच्यावर उपाययोजना करता येईल अशी ग्वाही दिली. ग्रामीण भागातली प्रलंबित असलेल्या विकास कामासंबंधी तहसीलदार यांनी सविस्तर चर्चा केली याच्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात यावी अशा सूचना संबंधित विभागाला देण्यात येईल असे यावेळी नवनिर्वाचित गटविकास अधिकारी यांनी सांगितले
0 Comments