Ticker

6/recent/ticker-posts

परिसर परिचय अनुषंगाने रॅपीड ॲक्शन फोर्सचे जिल्हाभरात पथसंचलन संपन्न.


परिसर परिचय अनुषंगाने दिनांक ०७ जून ते १२ जून, २०२३ पर्यंत RAF - Rapid Action Force + RCP व QRT पथक + स्थानिक पोलीस यांच्या समन्वयातून ठिकठिकाणी परिसर परिचय पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते. Rapid Action Force हे CRPF चा एक भाग असून RAF ची स्थापना १९९१ साली झाली ज्याचे मुख्यालय दिल्ली येथे आहे. सद्यस्थितीत भारतात एकूण १५ बटालियन असून वाशिम जिल्ह्यामध्ये हैदराबाद येथील ९९ RAF बटालियन रूट मार्चकरिता दाखल झाले होते.
      
भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास जिल्ह्यातील प्रमुख शहरांतील संवेदनशील ठिकाणांची व परिसराची माहिती Rapid Action Force ला व्हावी या उद्देश्याने सदर परिसर परिचय पथसंचलन आयोजित करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर दि.०८ जून रोजी मालेगाव येथे, दि.०९ जून रोजी कारंजा शहर येथे, दि.१० जून रोजी रिसोड व शिरपूर येथे, दि.११ जून रोजी मंगरूळपीर येथे व दि.१२ जून रोजी पो.स्टे.वाशिम शहर येथे सदर पथसंचलन रूट मार्च अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला. नागरिकांनी या पथसंचलनाला भरभरून प्रतिसाद दिला व कायदा व सुव्यवस्था तसेच नागरिकांची सुरक्षा योग्य हातात सुरक्षित आहे असा विश्वास बोलून दाखविला.
   
  दि.१२ जून, २०२३ रोजीच्या संध्याकाळी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणात Rapid Action Force च्या अधिकारी/जवानांचा तसेच RCP पथक व स्थानिक पोलीस अधिकारी अंमलदार यांचेसाठी स्नेहभोजन व RAF पथकाला निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास वाशिम पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार तसेच RAF पथकातील अधिकारी व अंमलदार हजर होते.
           
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास जिल्ह्यातील प्रमुख शहरांतील संवेदनशील ठिकाणांची व परिसराची माहिती

Post a Comment

0 Comments