Ticker

6/recent/ticker-posts

हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन मंगरूळपीर येथे शेतकरी संवाद मेळावा

 
पाऊस लांबला असला तरी यावर्ष भरपूर प्रमाणात पाऊस पडणार असल्याचे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी सहकार महर्षी कै. डॉ. अण्णासाहेब कोरपे जन्म शताब्दी निमित्त जिल्हा मध्यवर्ति को ऑफ सहकारी बँक व कृषी उत्पन्न बाजार समिती मंगरुळपीर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट प्रांगणात दि. १३ रोजी कार्यक्रमात सांगीतले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री सुभाष रावजी ठाकरे हे होते.हवामान तज्ञ पंजाबराव डख मंगरूळपीर तालुक्यात मोलाचे मार्गदर्शन ८ जून नंतर मान्सून राज्यात दाखल होणार त्याप्रमाणे मान्सून महाराष्ट्रांत दाखल झाला आता मान्सूनचे आगमन पश्चिमेकडून न होता मधल्या काळात वातावरण पोषक होऊन पूर्वेकडून पाऊस सुरवात होणार असून ज्या या भागात पाऊस जास्त होईल त्या ठिकाणी 
शेतामध्ये पाण्याची ओल जमिनीमध्ये गेल्यानंतर पेरणीचा निर्णय शेतक-यांनी घ्यावा असे सांगीतले त्याच प्रमाणे २२ ते २७ जून पर्यंत पाऊसाचे पूढील टप्पा असुन त्यानंतरही माहे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, मध्ये पाऊस भरपूर प्रमाणात होणार असल्याचे पंजाबराव डख यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याच
प्रमाणे २६ आक्टोंबर पासून हिवाळ्यास सूरूवात होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले. त्याच बरोबर गारपिट, अवकाळी पाऊस, विजां पासून शेतक-यांनी आपला बचाव कसा करावा पेरणी, फवारणी, खत इत्यादी. बाबत शेतकऱ्यांना पिंकाबाबत सविस्तर 'असे मार्गदर्शन शेतक-यांना यावेळी पंजाबराव डख यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री सुभाषराव ठाकरे यांनीही शेतक-यांना यावेळी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचलन प्रा. कावरे यांनी तर आर के राठोड यांनी आभार मानले.

यावेळी कृषी उतपन्न बाजार समीती, खरेदी विक्री संघ, जिनिंग प्रेसिंग, जि. मध्य. को ऑफ बँक, कृषी विभाग, कर्मचारी, संचालक मंडळ, पदाधिकारी, कार्यकर्ते मंगरूळपीर तालुक्यातील शेतकरी बांधव, नागरीक आदी यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments