Ticker

6/recent/ticker-posts

श्री वसंतराव नाईक महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

मंगरूळपीर :- स्थानिक श्री.वसंतराव नाईक कला व श्री.अमरसिंग नाईक वाणिज्य महाविद्यालय मंगरूळपीर येथील संस्थेचे अध्यक्ष मा.आ.अ. राठोड साहेब व मानद व्यवस्थापकीय कार्यकारी अधिकारी डॉ.एल.के. करांगळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम.वडगुले यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय सेवा योजना व शारीरिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.एस.एम.वडगुले व प्रमुख अतिथी डॉ.एल.के.करांगळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक, शारीरिक शिक्षण संचालक प्रा.एस.जी.ढाकूलकर यांनी आपल्या मार्गदर्शनातून योगासनाचे जीवनातील महत्त्व सांगून, उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना माहिती दिली. व निरोगी शरीरासाठी नियमित योगासने व प्राणायाम सर्वांनी करावे असे आवाहन केले. त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.पी.आर.तायडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून मनाच्या एकाग्रतेसाठी योगासने व प्राणायाम हे आवश्यक असून ती काळाची गरज असल्याचे सांगितले. व उपस्थित सर्वांचे त्यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला संस्थेचे कोषाध्यक्ष श्री.पी.पी.इंगोले, डॉ.एस.ए.राठोड डॉ.डी. जी.राठोड,डॉ.एन.बी.मठपती. प्रा. श्रृंगारे, प्रा.व्ही.पी.हिस्सल,कनिष्ठ महाविद्यालयीन प्रभारी प्रा.पी.एन. जाधव, प्रा.कोवे व इतर वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयीन सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व रासेयोच्या विद्यार्थ्यांनी योग दिनानिमित्त सहभाग नोंदविला.

Post a Comment

0 Comments