Ticker

6/recent/ticker-posts

राजर्षी शाहू महाराज जयंती जयंतीचे औचित्य साधून दहावी व बारावी मधील गुणवंत वीद्यार्थ्यांचास न्मान सोहळा

26 जून हा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याच्या व सर्व नागरीकांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता प्राप्त करुन देण्याच्या अनुषंगाने

लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंती जयंतीचे औचित्य साधून  दहावी व बारावी मधील गुणवंत वीद्यार्थ्यांचा सत्कार व गावपातळीवर सर्व स्तरावर कार्य करणाऱ्या विवीध क्षेत्रातील मान्यवर आशा सेवीकांचा सन्मान आयोजीत करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला विशेष मोलाचे मार्गदर्शन होणार आहे परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला  आवर्जून उपस्थित रहावे या कार्यक्रमासाठी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आपल्या विभागाचे कर्तव्यदक्ष मा.  सखारामजी मुळे (उपविभागीय अधिकारी मंगरुळपीर) अध्यक्षव्या ख्याता मा. सौ. सविता अतकरे मोरे (उपशिक्षणाधिकारी वाशिम)

प्रमुख उपस्थिती मा.  जगदीश पांडे (प्र. उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगरुळपीर) मा.  रवि राठोड, (प्र. तहसिलदार, मंगरुळपीर) मा. सुधाकर आडे, ठाणेदार, (पो.स्टे. मंगरुळपीर) मा.  कैलासराव घुगे (पं.स. गट विकास अधिकारी मंगरुळपीर) मा.  अरविंद भगत ( तालुका आरोग्य अधिकारी) मा.  सतिष शेवदा (प्र.मुख्याधिकारी न.प. मंगरुळपीर) मा.  नितीन श्रीकृष्ण लुंगे (बालविकास प्रकल्प अधिकारी) मा.  हिरालाल जांभुळकर (उपअभियंता महावितरण) मा. विनोद डेरे संपादक, जिल्हाध्यक्ष एकता पत्रकार संघ या कार्यक्रमाचे आयोजन जुने पंचायत समिती सभागृह, मंगरुळपीर वेळ : सकाळी ११ वा.

राजर्षी शाहू हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जातात. शाहू महाराज हे एक सक्षम राज्यकर्ते होते. त्यांच्या राजवटीत शाहू महाराजांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवली. १८९४ मधील त्यांच्या राज्याभिषेकापासून ते १९२२ मध्ये त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी राज्यातील मागास जातींतील लोकांसाठी काम केले. जात-पंथाची पर्वा न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे प्राधान्य होते.

ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळात शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली, तसेच सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराजांना "राजर्षी" ही पदवी त्यांच्या राज्यभिषेकाच्या वेळी त्यांना त्याच्या क्षात्र गुरुने दिली. राजर्षी शाहू महाराज  जयंतीचे निमित्ताने ज्ञानाची शिदोरी वाटली जाणार आहे.  सोमवार दि. २६ जुन २०२३ ला भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन एकता प्रेस क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments