Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम शहरातील जबरी चोरी ३६ तासांत उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश ; ०४ आरोपींसह ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त.

 समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था नांदावी व कायद्याचे राज्य अबाधित राखावे यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सदैव दक्ष असून नागरिकांच्या मालमत्तेची चोरी/नुकसान करणाऱ्याविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई केली जाते. नुकतेच वाशिम शहरातील महालक्ष्मी पेट्रोल पंपासमोर रस्त्याने जात असलेल्या इसमास मारहाण करून जबरी चोरी करणाऱ्या ०४ आरोपींना ३६ तासांत अटक करून गुन्हा उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झाले आहे.
          
दि.२२.०६.२०२३ रोजी वाशिम शहरातील सोईतकर रेडीमेड, पाटणी चौक, वाशिम येथे मजुरीचे काम करणाऱ्या एका ४८ वर्षीय मजुरास महालक्ष्मी पेट्रोल पंपासमोरून रस्त्याने पायी जात असतांना रात्री ०९.०० वाजता अंधाराचा फायदा घेऊन चार युवकांनी मारहाण करत लुटले होते. सदर प्रकरणी पो.स्टे.वाशिम शहर येथे अप.क्र.५२५/२३, क.३९४, ३४ भा.द.वि. नुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. सदर प्रकरणाचा तपास करत असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे व आपले तांत्रिक तपास कौशल्य पणाला लावून आरोपी निष्पन्न केले व वाशिम शहरातील खामगाव जीन येथून ०२ आरोपी व भीमनगर व माहूरवेश परिसरातून ०२ आरोपी असे एकूण ०४ आरोपींना ताब्यात घेतले.
सदर प्रकरणातील आरोपींचे नाव पुढीलप्रमाणे आहेत. 👇
1) संदीप भारत कांबळे, वय 29 वर्षे, रा.भीम नगर, वाशिम.
2) गणेश डीगांबर खंडारे, वय 22 वर्षे, रा.खामगाव जिन, वाशिम.
3) विशाल उर्फ प्रवीण उर्फ हनिसिंग गुलाब वाघमारे, वय 23 वर्षे, रा.खामगाव जिन, वाशिम.
4) बद्री उर्फ अभिषेक प्रेम धबाले, वय 21 वर्षे, रा.माहूरवेश, वाशिम.
 सदर आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल व रोख रक्कम ५२००/- रु. असा एकूण ५५,२००/-रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास व कायदेशीर कारवाई सुरु आहे.
     सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह(IPS), अपर पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.सोमनाथ जाधव, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांचे पथक सपोनि.अजिनाथ मोरे, पोना.प्रशांत राजगुरू, ज्ञानदेव मात्रे, महेश वानखेडे, आशिष बिडवे पोशि.विठ्ठल महाले, दीपक घुगे, विठ्ठल सुर्वे सर्व नेमणूक स्था.गु.शा., वाशिम यांनी पार पाडली.

 

Post a Comment

0 Comments