कारंजा
कोणतेही लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आपले ध्येय गाठण्यासाठी जिद्द आणि चिकाटी अंगी असली यश प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही अशा प्रकारचे प्रतिपादन रांका नेते हाजी मो युसुफसेठ पुंजानी यांनी १७ जुन रोजी स्थानीय अस्ताना परिसरात आयोजित प्रतिभाशाली विद्यार्थ्यांच्या सत्कार तथा अभिनंदन कार्यक्रमाप्रसंगी केले.
सविस्तर असे की, विविध क्षेत्रात अद्वितीय यश संपादन करून कारंजा नगरीचे नावलौकिक वाढविणाऱ्या प्रतिभाशाली विद्यार्थ्यांचा माजी नप शिक्षण सभापती तथा मित्रमंडळ अस्ताना कारंजा यांचे वतीने भव्य सत्कार व अभिनंदन कार्यक्रमाचे आयोजन १७ जून रोजी करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हाजी मो युसुफसेठ पुंजानी यांचे हस्ते वैधकीय प्रवेश पूर्व परीक्षा नीट मध्ये ७२० गुणांपैकी ६९७ गुण मिळवणाऱ्या मो उजेर इरफान रुलानी, शिफान जमिल अहेमद ६५५,समित खान साजिद खान ६६७,हाफिज जव्वद अली ५१२ व शोएब सलीम मुन्नीवाले ४५१ याच प्रमाणे राज्यस्तरीय स्ट्रेंथ लिफ्टिंग मध्ये सुवर्ण पदक मिळवून राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या मो अलत्मश नाजीम कुरेशी व इसरो मध्ये नामांकन प्राप्त करणाऱ्या अरहम हाशिम मो अजमल यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.रांका नेते हाजी मो युसुफसेठ पुंजानी यांचे अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात कारंजा नप माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके,कारंजा डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ अजय कांत,अड जुनेद खान,डॉ अजमल,डॉ रागिब खान,डॉ एजाज खान,मौलाना अ मजीत,मौलाना काजी इकबाल,इंजिनिअर अक्षय लुंगे,प्रशिक्षक गौरव सर,नगरसेवक जाकीर शेख,अ एजाज,सै मुजाहिद, आदी मंचकावर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून समाजातील शिक्षित नागरिकांनी पुढाकार घेऊन प्रतिभाशाली विद्यार्थी घडविण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम तयार करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.आपल्या अध्यक्षीय भाषणात पुंजानी यांनी सांगितले की,शिक्षित समाज हा विकासाचा केंद्रबिंदू असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे आवश्यक असल्याचे सांगितले. समाजसेवेची जिज्ञासा ठेऊन विद्यार्थ्यांनी इमानदारीने मेहनत केल्यास यश प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही असे ते म्हणाले, आयोजित कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक वर्ग परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन शमीम फरहात व जावेद चाऊस यांनी केले.कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी जाकीर अली मित्रमंडळ पदाधिकारी व सदस्यांनी अथक परिश्रम केले.
0 Comments