मंगरुळपीर.........आंतरराष्ट्रीय विश्व योग दिवस, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले उद्यानात, असंख्य योग साधकांच्या उपस्थितीत, शहराचे उपविभागीय अधिकारी सखारामजी मुळे साहेब, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबाफुले सामाजिक संस्था, अध्यक्ष संजयजी मिसाळ, सचिव अशोक राऊत, शहर, तालुका भाजपा कार्यकारिणी, यांच्याद्वारे सकाळी ठीक पाच वाजता, दीप प्रज्वलन करून, योग प्राणायामाला सुरुवात झाली.
गेल्या दीड वर्षापासून, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले उद्यानात, सर्वांसाठी सामूहिक दैनिक निःशुल्क योगप्राणायाम अखंड, अविरत, अविचल, पतंजलि योग समिती जिल्हा वाशिम जिल्हाअध्यक्ष व योगशिक्षक श्री राम दत्तात्रय व्यवहारे, यांच्या मार्गदर्शनात, सुरू आहे, प.पू. योगगुरु स्वामी रामदेवबाबा, व आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान, नरेंद्रजी मोदी यांच्या पुरुषार्थाने जगभरात, आजचा योग महोत्सव महायज्ञ, मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
दीड तास पूर्ण योगसाधना करून, राष्ट्रीय योगाप्रोटोकॉल पूर्ण करून, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती तैलचित्राचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते आज संपन्न झाले. शहरात ,मध्यभागी असलेले हे उद्यान विकसित करण्यासाठी, सर्व जाती, धर्म, समाजाचे सेवाभावी, व्यक्तींनी समोर येऊन, योग करण्यायोग्य केले, विशेष संस्थेचे सचिव अशोक राऊत यांचा, यामध्ये अखंड प्रचंड, पुरुषार्थ आहे.
यामध्ये, योगासन व स्पोर्ट असोसिएशन जिल्हा वाशिम, यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
सर्व स्तरातील महिला पुरुष युवा युतींनी आजच्या योग महा यज्ञामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, राजकुमार गावंडे, गजानन त्राटक, संजयजी दुर्गे, केशव अंजनकर, विजय पवार, गजानन राऊत, बाळासाहेब धोटे, गजानन बुरे, देवमन व्यवहारे, शाम रावपलाई, भास्कर आडे, गणेश साबळे, राजेश राऊत, राजेश गावंडे, राजीव कातखेडे, शाम दंडे, सुभाष भोयर, व सर्व महिला पुरुष दैनिक योगसाधकांनी अथक परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे संचलन, उर्फ कलारसिक राधेश्री यांनी यांनी केले. सर्वांचे आभार योगशिक्षक श्री राम दत्तात्रय व्यवहारे यांनी मानले. उद्यानात दररोज सर्वांसाठी योग सुरू आहे सर्वांनी निःशुल्क लाभ घेण्याचे आवाहन राम व्यवहारे यांनी केले.
आंतरराष्ट्रीय योग दिवस आज उत्साहात साजरा करण्यात आला.
0 Comments