पुणे येथे अखिल लोणारी समाज सेवा संघा च्या वतीने
दि १७/०६/२०२३ शनिवार रोजी अल्पबचत सांस्कृतिक भवन, कौन्सिल हाॅलच्या ( विधान भवन ) मागे, पुणे येथे भव्य दिव्य परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी आमदार रवींद्र धंगेकर व अनेक दिग्गज मान्यवरांनी उपस्थित राहून वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यात आला.
या मेळाव्याची ठळक वैशिष्ट्ये प्रवेशद्वारावर लोणारी समाज महिला बचत गटाच्या महिलांनी ड्रेस कोड मध्ये आलेल्या सर्व समाज बांधवांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले असून आलेल्या सर्व समाज बांधवांचे त्यांनी लक्ष वेधून घेतले. संघाचे पंधरा संचालक मंडळ व्यासपीठावर आणि बाहेरून आलेले प्रतिष्ठित समाज बांधव विराजमान होते तसेच संघाच्या आजीव सदस्यांना मिळणारी वधूवर सूची पुस्तिका विनामूल्य न दिल्याने काही मंडळीचा नाराजीचा सूर उमटला होता पण एवढ्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये काही गोष्टी आणा वादाने राहून जातात त्यामुळे समाजाने नाराज न होता समाजाचे हित जोपासण्यामध्ये आपला मोठेपणा दाखवावा असेही यावेळी काही सुज्ञ समाज बांधवांच्या चर्चेतून ऐकण्यात येत होते. ज्यांना वधूवर सूची पुस्तिका पाहिजे त्यांनी ३००/- देऊन घ्यावी. जे सभासद नाहीत त्यांच्यासाठी ३००/- रुपये घेणे योग्य आहे. पण संघाचे जे आजीव सभासद आहेत त्यांना द्यायला पाहिजे होती. असेही चर्चिला जात होते.
या निर्णयाने संघाबद्दल लोकांनी नाराजी व्यक्त केली. परंतु हे योग्य अयोग्य हे सुज्ञ समाज बांधवांनी ठरवावे.
उपस्थित असलेल्यांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला आणि चांगले उत्तम भोजन दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
) वधूवर मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला. सकाळी ११ ते ०६ वाजेपर्यंत समाज बांधवांच्या एकमेकांच्या गाठीभेटी व वधूवर संशोधन चालू होते.
उपस्थित समाज बांधवां कडून आजीव सभासदांना वधूवर सूची पुस्तिका विनामूल्य न देण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा असा सूरही उमटताना दिसला
वधूवर मेळावा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कष्ट करणाऱ्या सर्व टीमचे अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले समाजामध्ये वधू वर परिचय असो या लग्न सोहळे यामध्ये सर्वांचे मत मतांतरे एक जरी नसले तरी समाजाने या कार्याला ज्यांनी वाहून घेतले अशा लोकांचा आदर करून चांगल्या प्रकारे समाजामध्ये जुन्या रूढी परंपरेला बगल देऊन कार्यामध्ये सर्वांनी याही पुढे जोमाने कार्य करावे.
वधू वर परिचयाचे वार्तांकन ज्येष्ठ समाजसेवक हरिभाऊ जी पाटसकर यांनी समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न केला व समाजाची उत्तरोत्तर प्रगती होवो असे पाटसकरांनी प्रतिनिधीशी बोलताना आपलेमत मांडले
0 Comments