Ticker

6/recent/ticker-posts

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आज वाशिम येथे जिल्हास्तरीय बैठक


वाशिम - साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या येत्या १ ऑगष्ट रोजी जयंतीनिमित्त विविध सामाजीक कार्यक्रमाची रुपरेषा व जयंती उत्सवानिमित्त मिरवणूकीच्या नियोजनासाठी रविवार, ९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता स्थानिक शासकीय विश्राम भवन येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर बैठकीमध्ये समाजबांधवांच्या एकत्रित विचार विनिमयातून जयंती कार्यक्रमाची पुढील रुपरेषा आणि जयंती उत्सव कार्यकारणी ठरविण्यात येईल. तरी सदर महत्वपुर्ण बैठकीला समस्त मातंग समाजबांधवांनी बहूसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मातंग समाजबांधवांच्या वतीने डेमोक्रॅटीक पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष संतोष इंगळे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments