लोकशाहीर, सत्यशोधक, साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या मानवतावादी विचारांना आदर्श मानून सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक व विविध जनसेवेच्या क्षेत्रात रेवती ताई आपण कार्यरत आहात. आपल्या या महत्वपूर्ण कार्याची दखल घेऊन लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेध राष्ट्रीय पुरस्कार- २०२३ या पुरस्काराने आम्ही आपला सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. या पुरस्काराचे स्वरूप मानाचा फेटा, सन्मानचिन्ह आणि चार हजार रुपयांची पुस्तके असे असून मंगळवार दि. १ ऑगस्ट, २०२३ रोजी दुपारी ४:३० वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते रेवती ताई आढाव .नवी मुंबई समाजसेविका,अनेक टीव्ही सिरीयल मध्ये यांनी नटसम्राट म्हणून भूमिका निभवल्या आहेत , विधवा महिला विकास मंचच्या कालिंदी ताई पाटील यांच्या मार्गदर्शनातून 36 जिल्ह्यापर्यंत कार्य केले आहे. एवढेच नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिथे बॅरिस्टर झालेत त्या संस्थेत लंडनमध्ये सुद्धा यांचा सन्मान करण्यात आला आहे. पीडित महिलांसाठी अनेक जिल्ह्यात कार्य केले आहे. अशा बहुगुणी रेवती ताई आढाव
यांना पुरस्कार देऊन सन्मानित केल्या जाणार आहे. यांच्यावर सर्वतोपरी शुभेच्छा च्या वर्षा होत आहे.
0 Comments