Ticker

6/recent/ticker-posts

श्री वसंतराव नाईक महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम

मंगरूळपीर : स्थानिक श्री वसंतराव नाईक कला व श्री अमरसिंग नाईक वाणिज्य महाविद्यालय, मंगरूळपीर संस्थेचे अध्यक्ष, मा. श्री. आ. अ. राठोड साहेब व महाविद्यालयाचे माजी प्राचार्य मा. डॉ. एल.के. करांगळे यांच्या मार्गदर्शनाने व महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने मा श्री वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ .एस.एम‌.वडगुले यांच्या हस्ते मा. श्री.वसंतरावजी नाईक  यांच्या प्रतिमेचे पूजन दीपप्रज्वलन व पुष्पहाराने करण्यात आले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. उपस्थित सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मा.श्री.वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून अभिवादन केले. आणि महाविद्यालयीन परिसरात राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.पी.आर तायडे व कनिष्ठ महाविद्यालयीन रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.एस.एन  टापरे यांच्या उपस्थितीत व प्राचार्य डॉ.एस.एम.वडगुले  यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी रा सेयो स्वयंसेवक उपस्थित होते.
यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments