Ticker

6/recent/ticker-posts

'हे' तत्काळ बंद करा! बच्चू कडूंचं तेंडुलकरला आवाहन; लिहिलं खुलं पत्र

माजी किक्रेटपटू आणि माजी खासदार सचिन तेंडुलकरला आमदार बच्चू कडू यांनी थेट आवाहन केलं आहे. तेंडुलकरनं जुगाराला प्रोत्साहन देणाऱ्या गेम्सची जाहिरात करु नये, असं आवाहन कडू यांनी केलं असून यासाठी तेंडुलकरला खुल पत्रही लिहिलं आहे. बच्चू कडू म्हणतात, "सचिन तेंडुलकर हे भारतरत्न आहेत. असंख्य चाहते व भारतरत्न असणार्‍या व्यक्तीनं Paytm First सारख्या जुगार चालवणार्‍या गेम्स अॅपची जाहीरात करणं योग्य नाही. माझी महाराष्ट्र शासन आणि सचिन तेंडुलकर यांना विनंती आहे की कृपया या जाहिरातीवर तात्काळ बंदी घालण्यात यावी"
बच्चू कडूंनी लिहिलेल्या पत्रात काय म्हटलंय?पेटीएम फर्स्ट गेम या जुगाराची जाहिरात भारतरत्न सचिन तेंदुलकर करीत आहेत. सचिन तेंडुलकर हे प्रसिद्ध क्रिकेटर असून भारतात त्यांचे लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत चाहते आहेत. त्यामुळं ते करित असलेल्या जाहीरातींचा परिणाम लहान थोर सर्व स्तरापर्यंत होतो व या जुगाराच्या जाहिरातीला महाराष्ट्रातील जनता बळी पडत असून अनेकांचं कौटुंबिक आयुष्य उद्ध्वस्त देखील होत आहे, अशा प्रकारच्या तक्रारी बऱ्याच जणांकडून माझ्यापर्यंत प्राप्त झाल्या आहेत. यासाठी त्यांनी आझाद मैदानात आंदोलनही केलेलं आहे. 
देशात 'या' राज्यात बंदीपेटीएम फर्स्ट गेम या ऑनलाईन जुगारावर भारतातील आंध्रप्रदेश, आसाम, नागालँड, सिक्कीम, अरुणाचलप्रदेश, मेघालय, ओडीसा, तेलंगणा या आठ राज्यांमध्ये पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. भारतरत्न सन्मानानं सन्मानीत झालेल्या व्यक्तीनं अशा प्रकाराच्या जुगाराची जाहिरात करणं लोकांच्या हिताचं नाही. त्यामुळे भारतरत्ननं सन्मानित असलेल्या सचिन तेंडुलकर यांनी भारतातील जनतेचा विचार करून अशा प्रकारच्या जाहिराती करू नयेत ही देशवासियांसाठी त्यांची नैतिक जबाबदारी आहे.महाराष्ट्रातील नव्हेच तर भारताची पुढील पिढी या जुगाराच्या विळख्यातून वाचवायची असेल तर या जाहिरातीवर बंदी घालण्यात यावी आणि लोकांची व त्यांच्या कुटुंबियांची आर्थिक फसवणूक थांबविण्यात यावी, ही विनंती!

Post a Comment

0 Comments