राज्यातील राजकीय घडामोडीनंतर उद्धव ठाकरे मैदानात उतरलेयत. आजपासून उद्धव ठाकरे विदर्भ दौ-यावर आहेत. भाजपच्या बालेकिल्ल्यातून उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौ-याला सुरूवात करणार आहेत. पोहरादेवीचं दर्शन घेऊन दौ-याला सुरूवात होईल. त्यानंतर अमरावती, अकोला जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. अमरावतीनंतर उद्धव ठाकरे नागपूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी उद्या संवाद साधणार आहेत. विदर्भ दौरा संपवून ते 13 आणि 14 तारखेला मराठवाड्याच्या दौ-यावर असतील. नुकताच राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आपली पुढची रणनीती काय असणार यासाठीचा हा उद्धव ठाकरेंचा दौरा असेल.
उद्धव ठाकरे यांचा दोन दिवस विदर्भ दौरा, पोहरादेवीचं दर्शन घेऊन दौऱ्याला सुरुवात. संजय राठोडांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे. राज्यात गद्दार आणि लाचारांचं सरकार असल्याचं वक्तव्य करत ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल. भाजपला ठाकरे नकोत शिवसेना हवी होती अशी टीका ठाकरेंनी केलीय. आमदार गेले तरी दमदार शिवसैनिक सोबत... पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांचं विधान.
जे पीक कापून नेलं त्याला हमीभाव मिळतो का बघा?', उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सवाल. 'बाजारबुडव्यांचा भाजपने सांभाळ करावा', 'भाजप बोलण्याच्या लायकीचा नाही', 'अजितदादांमुळे मविआ सोडणारे गप्प का?', उद्धव ठाकरे यांचा सवाल. अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाबाबतचं वचन पाळलं असतं तर भाजप कार्यकर्त्यांना आता सतरंज्या उचलाव्या लागल्या नसत्या असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावलाय..
'पोहरादेवीचं दर्शन घ्यायचं मनात होतं', 'पवित्र तीर्थस्थळापासून दौऱ्याची सुरुवात करावी', 'पक्ष फोडाफोडी पाहिली, आता पक्ष पळवतात','पक्ष पळवणं हे महाराष्ट्रासाठी वाईट', राष्ट्रवादी फुटीवरून उद्धव ठाकरेंची टीका. 'अध्यक्ष चौकटीबाहेर निर्णय घेतील असं वाटत नाही','अध्यक्षांनी तसा निर्णय दिल्यास सुप्रीम कोर्टात जाऊ', 'दौऱ्यामागे कार्यकर्त्यांना भेटण्याचा उद्देश','आमच्याकडेही नवीन चेहरे येतायत','नवीन चेहऱ्यांना संधी देणार' ,'पीक कापलं असेल शेती आमची', उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा.

0 Comments