Ticker

6/recent/ticker-posts

गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळाची कार्यकारिणी गठन

     मंगरूळपीर-स्थानिक यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालयात गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे सत्र 2023-24 या वार्षिक सत्रा करिता  कार्यकारिणी दिनांक-29/08/2023 मंगळवार रोजी गठीत करण्यात आली.
   महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कान्हेरकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली उर्दू विभाग प्रमुख डॉ.खान यांच्या अध्यक्षतेखाली समन्वयक प्रा.एस.एस. जाजू यांनी आयोजन केले व प्रास्ताविकामध्ये यांनी गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळ अंतर्गत घेण्यात आलेले व घेतले जाणारे विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली. त्यामध्ये अध्यक्षपदी बी.ए. भाग ३ चे प्रिया राऊत तर सचिव पदी सुप्रिया भगत, उपाध्यक्ष अश्विनी फड, सहसचिव गौरी ठाकूर, कोषाध्यक्ष रेखा भगत, सहकोषाध्यक्ष लाजरी मिटकरी ,सल्लागार राणी जामणीके ,सहसल्लागार पल्लवी भगत ,प्रसिद्धी प्रमुख प्रज्ञा चुंबळे, सह प्रसिद्धी प्रमुख आरती गुप्ता तर सदस्य पदी साक्षी भगत ,चैताली पाकधने, शिवानी मोरे ,आचल चव्हाण, भक्ती सुर्वे ,अश्विनी लहाने, कल्याणी पाक धने ,विद्या नाकाडे, चैताली महल्ले, प्रणाली भोयर ,संतोषी हवा, पायल गावंडे , सोनम शृंगारे यांची निवड करण्यात आली. सर्व पदाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच डॉ. खान मॅडम यांनी कार्यकारिणी घोषित केली. कार्यक्रमाचे संचालन ललिता निंबेकर यांनी तर आभार भावना खंडारे यांनी मानलेत व महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments