रबाळे, नवी मुंबई.
वार्ताहर : अनंतराज गायकवाड
"निश्चय केला, नंबर पहिला" हे ब्रीद वाक्य असणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता सर्वेक्षण चालू असताना
रबाळे एमआयडीसी येथील सविता माई आंबेडकर, निब्बान टेकडी शाळेसमोर रस्त्याच्या मधोमध असलेल्या चेंबर मधून घाणीचे सांडपाणी वाहत असते.
ऐन सणासुदीच्या काळात स्थानिक रहिवासी, पदचारी, नोकरदार, विद्यार्थी सर्वांना त्रास होत आहे. सांडपाणी वाहून सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे, यातून पावसाळ्याच्या काळात डेंग्यू ,मलेरिया, हिवताप, लेप्टोस्पायरसीस सारखे घातक रोग देखील तोंड वर काढू शकतात. येथील लोकप्रतिनिधी ही याबाबतीत उदासीन दिसून येत असल्याचे निदर्शनात येत आहे तसेच महानगरपालिकेच्या वतीने घनसोली 'एफ' विभागातर्फे ही समस्या सोडविली जाणे अपेक्षित आहे. परंतु घणसोली वार्ड अधिकारी जाणून-बुजून या गोष्टीकडे कानाडोळा करीत आहेत की काय? असा संतप्त सवाल येथील नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.
0 Comments