Ticker

6/recent/ticker-posts

वनस्पतीशास्त्र विभागा अंतर्गत रानभाज्यांचे प्रदर्शन






मंगरूळपीर - श्री मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ कासोळा द्वारा संचालक यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागा अंतर्गत रानभाज्यांचे प्रदर्शन विद्यार्थ्यांमार्फत भरवण्यात आले याप्रसंगी बीएससीच्या विद्यार्थ्यांनी विविध भागांमधून रानभाज्या गोळा करून या भाज्यांविषयी संपूर्ण माहिती व भाज्यांचे गुणधर्म व मानवी शरीरास होणारे फायदे याविषयी माहिती संकलित करून त्याचे पोस्टर बनवण्यात आले व उपस्थित विविध वर्गांच्या विद्यार्थ्यांना या रानभाज्यांविषयी सविस्तर माहिती दिली या प्रदर्शनीचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सूर्यकांत कान्हेरकर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रदर्शनीला काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्याचे राऊंड ऑफिसर सुदर्शन सोनवणे यांनी भेट देऊन उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या प्रदर्शनेला महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांनी भेट देऊन रानभाज्यांविषयीची माहिती विद्यार्थ्यांकडून जाणून घेतली व विद्यार्थ्यांचे कौतुक केले ह्या कार्यक्रमाला आपत्ती व्यवस्थापनाचे सदस्य आदित्य इंगोले नयन राठोड बुद्धभूषण सुर्वे यांनी भेट देऊन उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता बीएससी प्रथम वर्षाचे विद्यार्थी तसेच वनस्पती शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर संजीव इंगळे डॉक्टर किरण मोरे तसेच प्राध्यापिका नम्रता धनजकर गणेश पाखरे यांनी विशेष परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.

Post a Comment

0 Comments