Ticker

6/recent/ticker-posts

श्री धानोरकर आदर्श विद्यालयात शाडू मातीचा गणपती बनवण्याची कार्यशाळा उत्साहात संपन्न


विदर्भात सर्वप्रथम  शाळेने
चिकणमाती किंवा शाडूची माती यांपासून मूर्ती बनवण्यासाठी
राबविण्यात आलेली कार्यशाळा

या कार्यशाळेमध्ये  मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला वर्ग पाच ते दहा च्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेऊन आपल्या कला कौशल्याने आपल्या आवडीची सुंदर अशा गणपती बाप्पाच्या मूर्ती बनवण्यात आल्या 
चिकणमाती किंवा शाडूची माती यांपासून मूर्ती बनवावी, असा शास्त्रविधी आहे. अन्य वस्तूंपासून (उदा. प्लास्टर ऑफ पॅरिस, कागदाचा लगदा) मूर्ती बनवणे, हे धर्मशास्त्रविरोधी आहे ! मूर्ती आकाराने लहान (एक फूट ते दीड फूट उंच) असावी ! मूर्ती पाटावर बसलेली, शक्यतो डाव्या सोंडेची आणि नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी ! हिंदूंचे प्रत्येक सण हे पर्यावरण पूरक आहेत, त्याच्या प्रत्येक कृतीत पर्यावरणाची काळजी घेतली जाते, गणेशमूर्ती ही पृथ्वीतत्त्वाशी संबंधित आहे.
 हे विद्यार्थ्यांना सांगितले या कार्यशाळेमध्ये एकूण 127 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला तशेच ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी श्री पाटील सर,श्री झळके सर,श्री वैभव धानोरकर सर,श्री विक्रम धानोरकर सर, श्री भगत सर,श्री उचित सर,सौ होले मॅडम यांनी मोलाचे सहकार्य केले या कार्यशाळेचे आयोजन श्री अजय ढेंगळे सर व श्री गणेश सावके सर केले होते
चिकणमाती किंवा शाडूची माती यांपासून  गणपती बाप्पाच्या मूर्ती
बनवण्याची कार्यशाळा  विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Post a Comment

0 Comments