Ticker

6/recent/ticker-posts

दीड वर्षात २२९८ पेक्षा जास्त आरोपींना अटक ; जिल्ह्याबाहेरील ३४७ व राज्याबाहेरील ४७ आरोपींचा समावेश.


जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम जिल्हा पोलीस दल सजग व सतर्क असून कायद्याचे पालन न करणाऱ्या विरोधात कडक कायदेशीर कारवाई केली जात आहे. विविध गुन्ह्यांमध्ये आरोपींच्या बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी आरोपींना अटक केली जाते. वाशिम जिल्हा पोलीस दलाने गेल्या दीड वर्षामध्ये विविध गुन्ह्यांमध्ये २२९८ पेक्षा जास्त फरार/पाहिजे आरोपींना अटक केली असून त्यामध्ये राज्यातील व परराज्यातील आरोपींचा समावेश आहे.

          अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी वाशिम जिल्ह्यातील आरोपींची संख्या १९०४ असून महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील आरोपींची संख्या ३४७ तर परराज्यातील आरोपींची संख्या ४७ इतकी आहे. बहुतांशी प्रकरणांमध्ये बाहेरील राज्यातील आरोपी महाराष्ट्रात येऊन गुन्हे करतात. अश्या आरोपींना अटक करण्यासाठी तपास पथके वरिष्ठांच्या मार्गदर्शखाली परराज्यात आरोपींच्या अटकेकामी रवाना होत असतात. गेल्या दीड वर्षामध्ये बाहेर राज्यातील अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या पुढीलप्रमाणे आहे - (उत्तर प्रदेश - ११ आरोपी, मध्य प्रदेश - १२ आरोपी, छत्तीसगड - ०१ आरोपी, पश्चिम बंगाल - ०२ आरोपी, हरियाणा - ०१ आरोपी, हिमाचल प्रदेश - ०१ आरोपी,  तेलंगणा - ०२ आरोपी, गुजरात - १७ आरोपी) असे एकूण ४७ आरोपींना बाहेर राज्यातून अटक करण्यात आलेली आहे.

          परराज्यातून अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मालेगाव येथील अंजनकार ज्वेलर्स, मालेगाव येथील खुनासह दरोड्यातील आरोपींना सातारा व अहमदाबाद गुजरात, गुडगाव हरियाणा राज्य येथून, पो.स्टे.वाशिम शहर येथे दाखल कलम ३०७ भादंवि मधील आरोपीस बिहार राज्यातून, वाशिम जिल्ह्यातील ATM Fraud प्रकरणातील आरोपींना कानपूर उत्तर प्रदेश व हिमाचल प्रदेश राज्यातून, पो.स्टे.वाशिम शहर येथे दाखल बोलेरो चारचाकी वाहन चोरी प्रकरणातील आरोपीस निजामाबाद, तेलंगणा राज्यातून ताब्यात घेण्यात आले आहे.

          जिल्ह्यातील नागरिकांची व त्यांच्या मालमत्तेची संरक्षण करण्यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सदैव तत्पर व सतर्क असून नागरिकांना काही माहिती पुरवायची असल्यास नियंत्रण कक्ष, वाशिम किंवा DIAL 112 किंवा संबंधित पोलीस अधिकारी/अंमलदार यांना माहिती पुरवावी, त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.


       (जनसंपर्क अधिकारी)
पोलीस अधिक्षक कार्यालय, वाशिम

Post a Comment

0 Comments