Ticker

6/recent/ticker-posts

सहकारी जिनीग प्रेसिंग ते अकोला रोड पर्यंतच्या सिमेंट रोळ साठी न प मुख्याधिकाऱ्यांना मुहूर्त मिळणार कधी

 
वार्ड क्र.1 मंगरुळपीर नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागते रस्त्याने




 वार्ड क्र.1 मंगरुळपीर जि.वाशिम येथील नागरीक रस्त्यावर
 सहकारी जिनींग प्रेसिंग ते अकोला रोड लगतचे मागील 20 ते 30 वर्षापासून राहणारे नागरीक आहोत. सहकारी जिनींग प्रेसिंग ते अकोला रोड हा रोड अत्यंत खराब झालेला आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता आशि या रोडची दयनीय व्यवस्था झाली आहे.या रोडने जिनींग प्रेसिंगचे लोडचे ट्रक व इतर वाहना मुळे मोठ मोठे खड्डे पडलेली आहेत यामुळे पावसाळयात या रोणे जीव मोठी घेऊन जाणे येणे करावे लागत आहे. या परिसरातील नागरिकांना खुप मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या रोडच्या दयनीय व्यवस्थेमुळे वाहनांनमुळे एखादा अपघात होवून जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  तसेच या रस्त्याने सदर वाहनची वर्दळ असल्यामुळे खुप मोठया प्रमाणात धुळ घरात येते व धुळीमुळे परिसरातील कुटुंबाचे अरोग्य धोक्यात आले आहे.

सहकारी निनीग प्रेसिंग ते अकोला रोड पर्यंतच्या  सिमेंट रोळ मंजूर झाला परंतु काम सुरू करण्यात आले नाही.

वाशिम रोड ते गोरे सर यांच्या घरापर्यंत डांबरीकरण रोडचे भूमिपूजन करण्यात आले. काम मंजूर. ठेकेदार व अभियंता यांना कामचे कामाचे मुहूर्त मिळेना .

या मागचा उद्देश कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी यांनी तपासून संबंधितावर कारवाई करतील का अशी चर्चा जनतेत जोर धरत आहे


 पावसाळ्यामध्ये या खडयांमध्ये पाणी साचून तिथे घाणीचे साम्राज्य निर्माण होवुन तेथे दुर्गधी साचल्या जाते व यामुळे तेथे मच्छर, माशा व इतर जिवघेण्या किटकांचा प्रादुर्भाव वाढल्या जावुन डेंग्यू, मलेरिया डायारीया सारखे आजार पसरून जिवीत हाणी होण्याची दाट शक्यता निर्माण आल्यामुळे  सर्व नागरीक न.प. मंगरुळपीर येथे गेलो असता त्यांनी सांगीतले की, हा रस्ता मंजूर इालेला आहे परंतु त्या करीता  कार्यालयाकडुन नाहरकत पाहीजे आहे.
त्यामुळे आम्ही सर्व नागरीक आपणास विनंती करतो की, आपण न. प. मंगरुळपीर कार्यालयाला आपल्या कार्यालयाकडून नाहकरत प्रमाणपत्र देण्याची कृपा करावी जेणे करुन हया रस्त्याची सिमेंट कॉक्रीटीकरण करून मीळेल व आम्हाला नाहक कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागनार नाही. न प ला नहारकर चे मूर्त कधी मिळणार व परिसरातील नागरिकांचा त्रास कधी थांबणार यासंदर्भात उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.वसंत चौधरी, सुभाषराव फुके, प्रकाश हवा, जगन्नाथ पातुरकर, खुशाल इंगळे, एम एम निशाने, सिद्धेश्वर पातुरकर, संजय चौधरी, भीमाआप्पा साखरे, साहेबराव फुके, दामोदर मिसाळ,निलेश मिसाळ, बबन डहाके, निरंजन चौधरी व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक लवकरात लवकर रोडचे काम चालू न झाल्यास आंदोलन करू असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले या परिसरात अपघात झाल्यास संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यावर कारवाई करून नुकसान भरपाई अधिकाऱ्याच्या खिशातून करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.
रोडच्या खड्ड्यात साचले घाण पाणी डेंगू सारख्या आजाराला आमंत्रणच,
परिसरातील नागरिकांना डेंगू होणार नाही याची घेणार का नगरपरिषद हामी

Post a Comment

0 Comments