1) प्रत्येक पालक आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्या करिता चांगले शिक्षण मिळावे म्हणून, आपल्या पाल्याला चांगल्यात चांगल्या शाळेत टाकतो व लाखो रुपये खर्च करतो.... एवढे करूनही विद्यार्थी अपयशी ठरत आहेत, आणि असे का होत आहे याचा विचार पालकांनी आवर्जून करायला हवा.....
2) जुन्या काळात विद्यार्थी ढ असेल तर ट्युशन लावायचे, त्यावेळी शाळा सरकारी असल्याने बाहेर ट्युशन लावून फिज देणे परवडायचे, पण आता ब्रँडेड शाळेत टाकण्याचा मोठेपणा करून लाखो रुपये फिज शाळेत भरूनही ढ विद्यार्थ्यांसोबत हुशार विद्यार्थ्यांना पण ट्युशन लावावी लागत असेल तर मग या शाळांमध्ये लाखो रुपये खर्च करण्यात काय अर्थ आहे.......
3) या खाजगी शाळा स्वतःच पेपर काढतात व स्वतःच शाळेत चेक करतात आणि मार्क कमी पडत असले तेही सढळ हाताने मार्क देऊन आपला धंदा चालवतात....
आपल्याला वाटते या शाळेत मुलांचा निकाल उत्कृष्ट लागला मार्क्स चांगले पडले, पण तसे नसते हे मार्क मुलांना पडलेले नसून ते मार्क शाळा चालावी म्हणून पालकांना दिलेले आमिष आहे.
4) *सध्याच्या काळात कॉन्व्हेंट स्कूल, इंग्लिश स्कूल व खाजगी शाळांमध्ये (अनुदानित व विनाअनुदानित) कोचिंगचे फॅड आले आहे.*
5) आजकाल अजून एक फॅड आले आहे. लाखो रुपये फिज घेणाऱ्या शाळा आता शाळेतच कोचिंग चालवत आहेत. जर हजारो रुपये फिज भरून शाळेत टाकल्यानंतरही परत शाळेतच ट्युशन लावावी लागत असेल तर त्याचा काय फायदा. शाळेत एवढी फिज भरून पण शिकवल्या जात नसेल आणि शाळेत ट्युशन लावावी लागत असेल तर काय फायदा.
6) बर शाळेत ट्युशन लावावी की नाही लावावी हे ठरविण्याचा अधिकार पालकांना व विद्यार्थ्यांना असायला हवा, पण तसे नाही, शाळेवाले पालक व विद्यार्थ्यांना जबरदस्ती करतात की ट्युशन शाळेतच लावावी, आणि नाही लावली तर त्या विद्यार्थ्यांना फेल करणे, प्रॅक्टिकल च्या मार्कंची धमकी देणे, त्यांचा निकाल कमी लावणे, त्यांना मानसिक रित्या टॉर्चर करणे आणि आमच्याकडे ट्युशन लावा नाहीतर तुमच्या मुलांची TC घेऊन जा अशा प्रकारे धमकावणे हे प्रमाण वाढत आहे.
7) काही शाळा (खाजगी सोबतच सरकारीही) अशा पण आहेत जिथे ट्युशन घेत नाहीत. पण शाळेत शिकवणारेच शिक्षक शाळेबाहेर ट्युशन घेतात आणि शाळेतल्या विद्यार्थ्यांना धमकी देऊन व टॉर्चर करून आमच्याकडेच ट्युशन लावा म्हणतात...... ज्या विद्यार्थ्यांनी यांच्याकडे कोचिंग लावली त्या विद्यार्थ्यांना शाळेतला पेपर ट्युशन मध्ये अगोदरच सांगून देणे, आणि ज्या विद्यार्थ्यांनी यांच्याकडे कोचिंग लावली नाही त्या विद्यार्थ्यांना शाळेतील परीक्षेत जाणून बुजून मार्क कमी देणे, वर्गात जाणून बुजून अवघड प्रश्न विचारणे, त्यांचा वर्गात अपमान करणे, त्यांना टॉर्चर करणे, त्यांना प्रॅक्टिकल च्या मार्काची धमकी देणे हा प्रकार वाढला आहे.... आणि पालक वर्ग चूप चाप बसून हे सर्व सहन करत आहे हीच खरी कमाल आहे....
8) शाळा व शिक्षकांनी धमकावणे, आणि विद्यार्थी व पालकांनी भिऊन शाळा व शिक्षकांच्या अत्याचाराला बळी पडणे हा शिक्षणाचा नेमका कुठला प्रकार आहे हे समजणे फार कठीण झाले आहे.....
9) पालकांनो भिऊन किंवा आपल्या पाल्याला भीती घालून जबरदस्तीने दिल्या जाणाऱ्या या शैक्षणिक प्रकाराला जर आज तुम्ही बळी पडले, तर तुमचे मुलं त्यांची येणारी पिढी ह्या दोघांचे भविष्य बर्बाद होत आहे हे लक्षात असू द्या....
10)कृपया, पालकांनी वरील गोष्टीचा तपास करावा, आणि निर्भीडपणे आपल्या पाल्याच्या पाठीशी उभे राहून वरील प्रकारचा विरोध करून आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्या करीता योग्य तो निर्णय घ्यावा.....
11) अशी म्हण आहे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते निर्भीडता शिकवते, लढणे शिकवते आणि आज मात्र लाखो रुपये देऊनही भिऊन शाळेत कोचिंग लावावी लागत असेल किंवा पालक व विद्यार्थी यांना भिती दाखवून शाळेतील शिक्षक स्वतःकडे कोचिंग लावायला बळजबरी करीत असतील तर मात्र सर्वांनी यावर विचार करण्याची आवश्यकता आहे.......
एक हतबल पालक
0 Comments