Ticker

6/recent/ticker-posts

भ्रष्टाचाराचा कोथळा काढता आला तर पहा, नाना पाटेकर


स्वराज्य संस्थापक  महान योद्धे आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची लंडनमध्ये असणारी वाघनखे लवकरच भारतात आणण्यात येणार आहेत. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार स्वतः वाघनखे आणायला लंडनला जाणार आहेत अशी माहिती मिळताच.  अभिनेते नाना पाटेकर यांनी एक पोस्ट शेअर करत मुनगंटीवारांना डिवलचं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरून नाना पाटेकरांनी एक पोस्ट शेअर करत सुधीर मुनगंटीवारांना डिवलचं आहे. त्यांनी लिहिलं आहे. 'मुनगंटीवार महाराजांची वाघनखे आणत आहेत... त्याबद्दल अभिनंदन... जमलं तर त्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा काढता आला तर पाहा. नानांच्या या पोस्टवर कोथळा काढलाय पण तुम्हाला डोळ्यावरील पट्टीमुळे दिसत नाही, भ्रष्टाचाराचा कोथळा काढायचा म्हणजे स्वतःच्या सरकारवर वार केल्यासारखं होईल. महाराजांच्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा काढणार नाहीत, उलट विरोधी व सत्ताधारी हे दोघेही भ्रष्टाचाराचा विरोध करतील आणि त्याचाच आर्थिक कोथळा काढतील, अशा कमेट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे ब्रिटनने आपणास देण्यास मान्यता दिली असून, त्यासाठी ऑक्टोबर महिन्यात राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मनुगंटीवार इंग्लंडला जाणार आहेत, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसिद्धी माध्यमाशी  बोलताना दिली. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं परत आणण्यासाठी इंग्लंडसोबत सामंजस्य करार करणार असल्याचं ते म्हणाले,

Post a Comment

0 Comments