मंगरूळपीर-यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालयात गृह अर्थशास्त्र अभ्यास मंडळा अंतर्गत पोषक आहार सप्ताहाचे औचित्य साधून वडरपुरा, वार्ड क्रमांक 40 येथील अंगणवाडी येथ
दिनांक-07/09/2023 गुरुवार रोजी अंगणवाडीतील मुलांना सकस आहाराचे वाटप व मातांना सकस आहाराचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन कार्यक्रम करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. अनुराधाताई देशमुख, प्रमुख अतिथी सुनंदा इंगोले ,राधा बेंद्रे मदतनीस तसेच समन्वयक प्रा. सौ. एस. एस. जाजू उपस्थित होते.
सर्वप्रथम प्रतिमा पूजन व हार अर्पण करण्यात आले व सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राणी जामनिके यांनी पोषक आहाराचे महत्त्व हे आपल्या मनोगततून स्पष्ट केले. तसेच प्रा. सौ. जाजू यांनी उपस्थित महिला व नवयुव ती यांना पोषक आहाराचे सखोल असे मार्गदर्शन केले त्यात पोषक आहार आणि आरोग्य यांचा फार घनिष्ठ संबंध आहे .योग्य आहारामुळे आपल्या शरीराची नैसर्गिक वाढ, विकास व दैनंदिन आरोग्य स्थिती कायम राखण्यास मदत होते असे प्रतिपादन केले. तसेच मदतनीस सुनंदा इंगोले व राधा बेंद्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच बी.ए .भाग 2 व 3 च्या विद्यार्थी यांनी सर्व विद्यार्थ्यांकरीता ज्वारीची मॅगी, मटकीची उसळ, शेंगदाण्याची चिक्की हे बनवून आणले व सर्वांना त्याचे आस्वाद घेण्याकरिता सकस आहाराचे वाटप केले तसेच अध्यक्षीय भाषणात सौ. अनुराधाताई देशमुख यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले व कार्यक्रम यशस्वी संपन्न झाले असे प्रतिपादन केले व त्यांनी पोषक आहारामुळे हानिकारक रोगजंतू व विषाणू विरुद्ध प्रतिकार शक्ती प्राप्त होऊन रोगांपासून संरक्षण मिळते असे प्रतिपादन केले.
पोषक आहार वाटप कार्यक्रम संस्थेचे सचिव माननीय चंद्रकांत दादा ठाकरे यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन ,प्राचार्य डॉ. कान्हेरकर सर यांच्या मार्गदर्शनात समन्वयक सौ. एस. एस. जाजू यांनी आयोजित केले. या कार्यक्रमात जवळपास 40 लाभार्थीने सहभाग घेतला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन भावना खंडारे यांनी तर आभार प्रदर्शन पायल गावंडे यांनी मानलेत व कार्यक्रम यशस्वी संपन्न झाले.
0 Comments