वाशी, नवी मुंबई.
वार्ताहर : अनंतराज गायकवाड
मराठा आरक्षणाच्या आंदोलकांवर काल जालना येथे गृह मंत्रालयाच्या आदेशावरून पोलिसांकडून लाठी चार्ज करण्यात आला. दुसऱ्या दिवशी या हल्ल्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रभर उमटले असून या घटनेची गंभीर दखल घेतली जात आहे परंतु या घटनेची दुसरी बाजू देखील हृदय द्रावक आहे यामध्ये नाहक पोलीस बांधवांवर आंदोलकांद्वारे दगडफेक करण्यात आली यामध्ये जवळजवळ दहा ते पंधरा पोलीस हेल्मेट न घातल्याने डोक्यात दगड लागून गंभीररीत्या जखमी झाले आहेत. या हिंसक घटनेची दखल म्हणून महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यांनी मराठा आंदोलकांना सरकार विरुद्ध मूळ उद्देश साध्य करण्यासाठी कायदेशीर लढा द्या, आणि आपले ध्येय साध्य करा. परंतु पोलीस बांधवांवर हल्ला करू नका, असे कळकळीचे आवाहन केले आहे. तसेच नवी मुंबई कार्यकारणी तर्फे शहर प्रमुख मयूर कारंडे यांनी खेद व्यक्त केला आहे.
कोट : _बांधवांनो आपल्या न्याय हक्कासाठी नक्की लढले पाहिजे, पण ज्यात कोणाचा काहीच दोष नाही अशा पोलीस बांधवांवर दगड फेक करुन काहीच साध्य नाही होणार. पोलीस पण आपल्या सारखा एक माणूसच आहे, फरक फ़क्त एवढा आहे की तो स्वतःच्या हक्कासाठी कधी लढू शकत नाही, आंदोलन करू शकत नाही, उपोषण करू शकत नाही. पोलीस फ़क्त करू शकतो वरुन आलेल्या आदेशाचे पालन. आणि यामध्ये त्याचा काही स्वार्थ अथवा उद्दीष्ट नसते. तो फ़क्त_ _सर्वांच्या रक्षणासाठी रस्त्यावर सदैव उभा असतो._
_पोलिसांना कधीच कोणत्या आंदोलन, उपोषण, मोर्चा ह्याचा वैयक्तिक त्रास नसतो, तो पण आपल्यासारखाच कोणत्या तरी जातीचा माणूसच आहे, तो कधी_ _हक्कासाठी लढू शकत नाही, कारण त्याला फ़क्त आदेशाचे पालन आणि कर्तव्य बजावणे बंधनकारक आहे_
_आपला लढा हा सरकार सोबत आहे, त्या निस्वार्थी सेवा करणाऱ्या_ _खाकी वर्दी सोबत नाही, म्हणून_ _हक्कासाठी सरकार सोबत लढू, आपापसात एकमेकांवर दगड फेक करुन आपन आपल्या हक्काच्या मुख्य उद्देशपासून वंचित राहु._ मयुर राजकुमार कारंडे ,नवी मुंबई शहर अध्यक्ष ,महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटना
0 Comments