Ticker

6/recent/ticker-posts

लोकशाही न्यूज़ चॅनलचे संपादक कमलेश सुतार विरद्ध खोटे गुन्हे दाखल केल्या प्रकरणी; वाशिम येथील सर्व पत्रकारांच्या वतीने काळया फिती लावून निषेध...

लोकशाही न्यूज़  चॅनलचे संपादक  कमलेश सुतार  यांच्यावर किरीट सोमैय्या विरुद्ध बातमी प्रसारीत केल्याने मुंबई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे आज वाशिम येथे राज्य सरकार विरोधात घोषणा बाजीदेत वाशिम येथील सर्व पत्रकारांच्या वतीने  काळया फीती लावून जाहीर  निषेध करण्यात आले आहे.
माजी खासदार किरीट सोमैय्या विरद्ध लोकशाही न्यूज़ मराठी चँनलचे संपादक कमलेश सुतार यांनी बातमी प्रसारीत केली होती.त्या व्हिडिओ मध्ये सोमैय्या अश्लील चाळे करतांना दिसून येत होते.हा मुद्दा विरोधी पक्ष नेते यांनी अधिवेशन मध्ये चांगलाच  गाजवला होता .तसेच या प्रकरणी चौकशी करून किरीट सोमैय्यांवर कार्रवाईची मागणी देखील करण्यात आली होती.या प्रकरणी सौमैय्यावर तर कारवाई झाली नाही.मात्र उलट ते प्रकरण समाजासमोर आणणाऱ्या  लोकशाही मराठी न्यूज़ चॅनलचे संपादक कमलेश सुतारवर आज मुंबई पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.त्यामुळे आज वाशिम येथील पत्रकारांच्या वतीने स्थानिक डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौकात या घटनेचा निषेध करण्यात आले. तसेच राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणा बाजी देत कमलेश सुतार यांच्यावरील खोटे गुन्हे सरकारने तात्काळ मागे घ्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी वाशिम येथील पत्रकार मोठ्या संख्यने सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments