Ticker

6/recent/ticker-posts

जालना जिल्ह्यातील घटनेच्या निषेधार्थ मंगरूळपीर बंद

मंगरूळपीर ता ५/ जालना जिल्ह्यातील मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनात पोलीसांनी केलेल्या लाठीचार्ज चा ता ५ रोजी मराठा क्रांती मोर्चाचे वतीने निषेध करण्यात आला.यावेळी शहरातील दुकाने बंद ठेवण्यात आली तर उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांचे मार्फत मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.

 निवेदनात नमूद आहे की,जालना जिल्हयातील अंतरावली सराटी या गावात मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातुन मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या चार दिवसापासून शांततेच्या मार्गाने उपोषण सुरू होते या उपोषणकर्त्याची तब्येत खालावली असताना महाराष्ट्राच्या महायुती सरकारमधील कुठल्याही जबाबदार मंत्र्यांनी या आदोलनाला भेट दिली नाही. उपोषण करत्यांना बळजबरीने दवाखान्यात भरती करण्याचा प्रयत्न पोलीस करीत होते. हया ठिकाणी बहुसंख्येनी जमलेल्या समाज बांधवावर पोलीसांनी अमानुषपणे लाठीचार्ज करून सदर आंदोलन दडपण्याचा प्रयत्न उघडपणे केला मराठा समाजाने आतापर्यत अनेक लाखोचे मोर्चे शांततेच्या मार्गाने काढले. या मोर्चाचा जगात इतिहास झालेला आहे. आणि शांततेच्या मार्गाने मागणी करत असतांना मात्र शासनाने आता पर्यत दुर्लक्ष केले आहे. सकल मराठा क्रांती मोर्चा शाखा मंगरूळपीर च्या वतीने आम्ही शासनाचा जाहीर निषेध करतो व ज्या पोलीसांनी अमानुषपणे आदोलन कर्त्यावर लाठीचार्च केला आहे. त्यांच्यावर त्वरित कार्यवाही करावी तसेच मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा.   अशी मागणी करण्यात आली.यावेळी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, कृषी सेवा केंद्र संघटना, किराणा असोसिएशन, माहेश्वरी समाज संघटना, राम ठाकरे मित्र मंडळ, शिवराज मित्र मंडळ, राजपूत समाज संघटना,भोई समाज संघटना, नाभिक समाज संघटना, ऑटो युनियन,रेडिमेड व कापड दुकान असोसिएशन,सराफा असोसिएशन यासह अनेक सामाजिक,राजकीय व व्यापारी संघटना यांनी बंद ला पाठिंबा दिला.

Post a Comment

0 Comments