श्री धानोरकर आदर्श विद्यालय येथे आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला त्यानिमित्त विद्यालयांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे प्राचार्य श्री मंगेश भाऊ धानोरकर यांनी भूषविले तर प्रमुख अतिथींचे स्थान विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षिका सौ धानोरकर मॅडम व उचित सर यांनी भूषविले कार्यक्रमाची सुरुवात डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून पुढील कार्यक्रम विद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व भाषणे सादर केली
आज वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वयंशासन दिन म्हणून शिक्षकांची वेशभूषा करून त्यांनी वर्ग 5 ते 9 च्या विद्यार्थ्यांना त्यांनी शिकविले व त्यांनी वर्गात शिकवण्याचा अनुभव व्यक्त केला
प्रमुख अतिथी उचित सर यांनी शिक्षक कसा असावा या विषयावर मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगेश भाऊ धानोरकर यांनी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते
0 Comments