प्रतिनिधी श्रावणी कामत
लोणावळा : रोटरी क्लब ऑफ लोणावळा व डॉ. बी. एन. पुरंदरे कला, एस. एस. जी.जी. वाणिज्य, एस. एस. ए. एम. विज्ञान महाविद्यालय व कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वलवन, लोणावळा च्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संपन्न झाले. शिबिराचे उदघाटन लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट चे सचिव मा.दत्तात्रय पाळेकर व रोटरी क्लब ऑफ लोणावळा चे अध्यक्ष श्री. दिलीप पवार यांचे शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी श्री. विशाल पाडाळे, मुस्तफा कॉन्ट्रॅक्टर, ऍड. अजय भोईर,सौ.विजया कल्याण (खजिनदार, रोटरी क्लब), नितीन कल्याण, रवींद्र कुलकर्णी, श्रीकृष्ण वर्तक, प्रभारी प्राचार्य डॉ. विलास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. रक्तदान शिबिर संपन्न होत असलेल्या कालावधीत लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट चे विश्वस्त श्री.नंदकुमार वाळज, धीरूभाई कल्याणजी, ऍड. मोनाली शेलार, सौ. दुरीया रामपूरवाला, उदय पाटील, जयवन्त नलावडे, कौस्तुभ दामले, पत्रकार श्रावणी कामत, राजेंद्र चौहान,मोहन वाघमारे, दिनेश रावळ यांनी सदिच्छा भेटी दिल्या. सदर प्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष व माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष श्री. विशाल विकारी, तसेच मावळ नागरिक चे संपादक श्री. संजय पाटील यांनी रक्तदान शिबिरात उत्साहाने सहभाग नोंदविला.
सदर कार्यक्रमात रक्तदात्यांना प्रमाणपत्र व आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. अक्षय ब्लड बँक हडपसर, लोणावळा महाविद्यालयाचे एन. एस. एस. प्रमुख डॉ. पवन शिनगारे, धनराज पाटील, संजय साळुंके, राहुल सलवदे, दीपक तारे, डॉ. राजेंद्र देवरे, डॉ. अमर काटकर, डॉ. नितीन बोडके, मल्हारी नागटीळक इ. प्राध्यापक आणि कनिष्ठ
व वरिष्ठ विभागाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.
0 Comments