Ticker

6/recent/ticker-posts

चिंचखेडा येथे छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण



हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे श्रीमंतयोगी ग्रुप व समस्त गावकऱ्यांचे आवाहन

(मंगरुळपीर दि.१६): मंगरुळपीर तालुक्यातील ग्राम चिंचखेडा येथे श्रीमंतयोगी ग्रुप, चिंचखेडा व गावकऱ्यांच्या पुढाकाराने विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ मूर्तीच्या स्थापनेचा अनावरण सोहळा बुधवार दि.२० सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:१५ वा.आयोजित करण्यात आला आहे .त्यानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ.बालाजी जाधव, छत्रपती संभाजीनगर यांच्या व्याख्यानासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

उद्या रविवार दि.१७ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ मूर्तीचे वाशिम शहरात आगमन होत असून मोटर सायकल रॅलीसह भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
पॉलिटेक्निक कॉलेज वाशिम, पाटणी चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, पुसद नाका, जागमाथा, बिटोडा भोयर ते चिंचखेडा असा या रॅलीचा मार्ग असेल.

तरी या रॅलीत व अनावरण सोहळ्यात जिल्ह्यातील तमाम शिवभक्तांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीमंतयोगी ग्रुप चिंचखेडा, समस्त गावकरी व संभाजी ब्रिगेडच्या वतीने संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष गजानन भोयर, जिल्हाध्यक्ष गणेश सुर्वे, मंगरुळपीरचे तालुका अध्यक्ष अजय गवारगुरु यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments