Ticker

6/recent/ticker-posts

ऍड. रामकृष्णजी राठी विधी महाविद्यालयामध्ये शिक्षकदिना निमित्य विद्यार्थी झाले शिक्षक



वाशिम :  ऍड. रामकृष्णजी राठी विधी महाविद्यालयामध्ये शिक्षकदिना निमित्त विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यां करीता स्वयं प्रशासन दिन साजरा करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भुमिका घेत पुर्ण दिवस आपले शिक्षक जे दैनदिनं कामकाज करतात त्याप्रकारे महाविद्यालयाची पुर्णपणे अभिरुप कामकाज पाहले. त्यामध्ये गजानन महाले, यांनी प्राचार्याची भुमिका बजावली तसेच कु पल्लवी ठाकुर, उर्वशि मालपाणी, फिजाखान, धम्मसागर अवचार, गजानन भड यांनी प्राध्यापकांची भुमिका बजावली.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रकाश दाभाडे यावेळी म्हणाले की, शिक्षक हे विद्यार्थ्यांना अमुल्य असे मार्गदर्शन करीत असतात याचा फायदा हा त्यांच्या जिवनामध्ये होत असतो तसेच आई वडीला नंतर शिक्षक हा त्यांच्या जिवनातील एक मोठा घटक असतो. शिक्षणाचे दालन हे महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई ज्योतीबा फुले यांच्या अथक प्रत्यनामधुन उघडी झाली तसेच डॉ राधाकृष्णन यांनी आपली जयंती साजरी न करता शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी असे प्रतिपादन केले. प्रमुख पाहुणे डॉ. सुशांत चिमणे यांनी मार्गदर्शन करतांना नमुद केले की, शिक्षक वर्गात शिकवणारा असतो सोबतच जो व्यक्ती आपल्याला कोणत्याही प्रकारचे ज्ञान देतो तो सुध्दा शिक्षकच असतो असे संबोधले. या प्रसंगी सर्व शिक्षकांचे व शिक्षकेत्तर कर्मचा-याचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत करण्यात आले.

विद्यार्थी हीताचे वेगवेगळे कार्यक्रम घेवुन विद्यार्थ्यांमध्ये विकास घडावा या सामाजिक संकल्पनेतुन असे विविध कार्यक्रम घेण्यासाठी महाविद्यालय नेहमी तत्पर असल्याचे कार्यक्रमाचे समन्वयक डॉ सागर सोनी यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन स्वर्दा दंडे व रेणुका जोशी यांनी केले प्रास्ताविक गोपाल वाढे तर आभार प्रदर्शन शिवाजी बळी यानी व्यक्त केले.
कार्यक्रमाला ग्रंथपाल संजय इढोळे, प्रा. ललिता दाभाडे, प्रा. सुमित राठी, तसेच महादेव सोमाणी, राहुल पांडे, जितेश अग्रवाल, शैलेश घाडके व संपुर्ण विधी विद्यार्थ्यांनींची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments