Ticker

6/recent/ticker-posts

तर आमच्या वर गोळ्या झाळा.... - इंजि.श्याम पावडे


जालना येथील आंतरवली सराटा या ठिकाणी मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज विरोधात कारंजा शहरात युवासेना (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) व युवक काँग्रेस च्या वतीने राज्य सरकार च्या विरोधात निषेध नोंदविण्यात आला. यावेळी युवासेना कारंजा शहर प्रमुख इंजि.श्याम पावडे यांनी राज्य सरकारला धारेवर धरत  आम्हाला आरक्षण द्या, किंवा आमच्या वर गोळ्या झाळा असे सूचक विधान केले. 
यावेळी प्रशासन गृहमंत्र्यांच्या ताटा
खालची मांजर होऊन मराठा समाजाची शिकार करत आहे असा सवाल उपस्थित केला
जालना येथील आंतरवली सराठा येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या हल्याच्या निषेधार्थ कारंजा शहरात युवकांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात 
यावेळी युवक काँग्रेस विधानसभा प्रमुख राज चौधरी, युवासेना शहर प्रमुख इंजि. श्याम पावडे, युवक काँग्रेस शहर प्रमुख प्रफुल्ल गवई, युवासेना विधानसभा प्रमुख शुभम वानखडे , युवासेना जिल्हा समन्वयक किरण तूपाडे, युवक काँग्रेस उपतालुका प्रमुख अभिजीत शिंदे , काँग्रेस चे संदेश जितुरकर, आमिर पठाण , अक्षय बनसोड युवासेनेचे उपशहर प्रमुख राज तूपोने, शरद कंटाले, भय्यू अहिरवर, दिवेश, आकाश तांबट, अभिजीत देशमुख, आशू तुरक, सचिन दहातोंडे , 
युवासेनेचे व युवक काँग्रेस चे पदाधिकारी  व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शांतता व सुव्यवस्थेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments