विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तराचे ओझे बस न मिळाल्याने विद्यार्थी हैरान
पवन राठी / शेलु बाजार- तालुक्यातील भुर, वनोजा, पुर, तांदळी येथील ३० ते ४० विद्यार्थी शेलुबाजार येथील लक्ष्मीचंद विद्यालयांमध्ये पाचव्या वर्गापासून ते दहाव्या वर्गापर्यंत शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना ये- जा करण्याकरिता वनोजा फाटा ते शेलुबाजार अशी एस.टी महामंडळाची पास काढलेली आहे. परंतु सकाळी नऊ वाजता पासून तर ११ वाजेपर्यंत वनोजा फाटा येथे मंगरूळपीर डेपोची बस किंवा दिग्रस डेपोची बस थांबत नाही. या वेळेत एखादी बस येऊन थांबेल या आशेने विद्यार्थी तासंतास वनोजा फाटा येथे तात्काळ बसत असतात. या बसची वाट पाहण्या पाहण्यात यांच्या शाळेची वेळ निघून जाते. काही विद्यार्थी आपल्या घरी परत जातात, तर काही विद्यार्थी शिक्षण घेण्याचेच आहे. या जिद्दीने वनोजा फाटा ते शेलुबाजार असे पायी पाच किलोमीटर पायदळ येतात. या विद्यार्थ्यांनी पास काढून सुद्धा शिक्षण घेण्याकरिता एसटी महामंडळाच्या
एसटी ड्रायव्हरच्या मनमानी कारभारामुळे किंवा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शाळा बुडायची वेळ आलेली असुन, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन, विद्यार्थ्यांना बस उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
शिक्षणाची आवड असल्यामुळे आम्ही सकाळीच ९ वाजता वनोजा फाटा येथे येऊन थांबत असतो बस येईल व आम्ही शाळेत जाऊ असे वाटपाहत ११ वाजता परंतु कुठलीही बस आम्हाला घेण्याकरिता वनोजा फाटा येथे थांबत नाही. काही बस थांबतात तर त्याच्यामध्ये पाय ठेवायलाही जागा नसते या या बस मध्येही आम्ही चढण्याचा प्रयत्न करतो तो डायव्हर कंडक्टर आम्हाला आवाज चे शब्दात वागणूक देतात. या बसच्या फेन्यात आमच्या शाळेचा खोळंबा होतोय व आमचे शिक्षण घेण्याचे स्वप्न स्वप्नच राहते की काय अशी भीती आमच्या मनात निर्माण झाली आहे. कोमल पवार विद्यार्थीनी
0 Comments