वाशिम : दि. 21 सप्टेबर 2023 रोजी,संपूर्ण अमरावती विभागात आणि आपल्या वाशिम जिल्ह्यातही भर दुपारी ढगांचा गडगडाट आणि विजांच्या लखलखाटासह सर्वत्र पाऊस कोसळला असून,अनेक भागात विजा कोसळल्याचे वृत्त आमच्या प्रतिनिधीनी कळवीले आहे. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील धनोडी येथील एक ग्रामस्थ विज पडून ठार झाला आहे.तर वाशिम जिल्ह्यातील अनसिंग येथील एक महिला विज पडून ठार झाल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे.
रिसोड तालुक्यातील तुकाराम विठोबा बाजड यांच्या शेतात विज पडून एक दुधाळ म्हैस व गाय ठार झाली.तसेच मानोरा तालुक्यातील ग्राम रुई गोस्ता येथील शेतकरी सुनिल वैजनाथ जंगम यांच्या शेतातील आंब्याच्या झाडालगत विज कोसळून झाडाखाली असलेली त्यांच्या बैल जोडीचे दोन्ही बिल मृत्युमुखी पडले.आणि सुनिल जंगम या शेतकर्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले. ही वार्ता रुई गोस्ता येथील नागरिकांना कळताच,हवामान अभ्यासक गोपालराव गावंडे,पोस्टमन निळकंठ बोरकर,हरिओम गावंडे, दिलीप जाधव,अशोक राठोड, विष्णू बोरकडे,शुभम जंगम आदी गावकरी घटनास्थळी रवाना झाले असून,मंडल अधिकारी आणि तलाठी यांनी घटनेचा पंचनामा करून,सुनिल जंगम या शेतकर्याला नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.असे वृत्त विविध ठिकाणच्या वार्ताहरा कडून मिळाल्याचे वृत्त प्राप्त झाल्याचे महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे.
0 Comments