Ticker

6/recent/ticker-posts

कारंजा शहरातील एका युवकावर स्थानबद्धतेची कारवाई ; वर्षभरातील MPDA कायद्याअंतर्गत तिसरी कारवाई.

 समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था नांदावी व कायद्याचे राज्य अबाधित राखावे यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सदैव दक्ष असून कायद्याचे पालन न करणाऱ्यांविरोधात सतत कडक कायदेशीर कारवाईचा सपाटा सुरु आहे. परंतु काहीजन कायद्याला न जुमानता त्यांचे गैरकृत्य सुरूच ठेवतात तेव्हा त्यांच्या मुसक्या आवळत त्यांच्या बेकायदेशीर कृत्यांना लगाम लावण्यासाठी त्यांच्यावर MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात येते.

कारंजा शहरातील शिवाजी नगर परिसरात राहणारा २२ वर्षीय युवक नामे स्वप्नील अशोक काळे हा शिवाजी नगर परिसरासह शहरात गुंडगिरी करतो. त्याचेविरुद्ध पो.स्टे.कारंजा शहर व पो.स्टे.मानोरा येथे खून, खुनाचा प्रयत्न, आत्महत्येस प्रवृत्त करणे, मारामारी करून परिसरात दहशत पसरविणे ई. अंतर्गत विविध गंभीर कलमान्वये एकूण ०७ गुन्हे दाखल आहेत.

सदर युवक हा गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्याने घातक शस्त्रासह परिसरात दहशत पसरवित धाक जमविण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे सार्वजनिक शांतता व सुव्यव्यवस्थेस बाधा उत्पन्न न व्हावा यासाठी सदर या युवकावर MPDA अधिनियम, १९८१ (सुधारणा १९९६, २००९ व २०१५) चे कलम ३(२) अन्वये ‘धोकादायक व्यक्ती’ या सदराखाली प्रस्ताव पोलीस प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात आला होता. सदर प्रस्तावाचे अवलोकन करून दि.०५.०९.२०२३ रोजी सदर आरोपींविरुद्ध स्थानबद्धतेचे आदेश मा.जिल्हादंडाधिकारी यांनी पारित केले आहे. या वर्षातील MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्धतेची हि तिसरी कारवाई असून सामाजिक शांतता व सुव्यवस्था बिघडवू पाहणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध अश्याप्रकारच्या कारवाया सातत्याने केल्या जाणार आहे.

सदर MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम येथील पोउपनि.शब्बीर पठाण नेमणूक - स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम व पो.स्टे.कारंजा शहर येथील पोउपनि.बुद्धू रेघीवाले व पथकाने मेहनत घेतली.


    

Post a Comment

0 Comments