अकोला.
महात्मा गांधी यांच्या जयंती पासून सुरु करण्यात आलेला अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील भारत राष्ट्र समितीचा जनजागृती पंधरवाडा चा समारोप घटस्थापनेच्या दिवशी भौरद या गावातील बैठकीने करण्यात आला . भारत राष्ट्र समितीचे अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक समाजसेवक गजानन हरणे यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात व गावकऱ्यांच्या सहकार्याने हा पंधरवाडा 2 ऑक्टोबर गांधी जयंती पासून तर 1५ ऑक्टोंबर 2023 पर्यंत साजरा करण्यात आला . या दरम्यान गावा गावांमध्ये बैठका, मतदार जनजागृती, समितीचे ध्येयधोरण, उद्देश, कार्य व शेतकऱ्यांसाठी यशस्वी झालेले" तेलंगणा मॉडेलची" माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्यात आली . गावागावात समितीच्या शाखा स्थापन करण्यात आल्या. तसेच इतर 50 गावांमध्ये जनसंपर्क अभियान राबवून मतदारांशी संपर्क करण्यात आला. जा गावांमध्ये जाहीर सभा बैठका घेण्यात आल्या त्यामध्ये दिनांक २ ला निंभोरा, ३ला येळवण, ४ ला अनवी मिर्झापूर, ५ ला सोनाळा, ६ ला घुसर, ७ ला कुटासा, ८ ला बहिरखेड, ९ ला धोतर्डी, १० ला शिवापूर, ११ला खरप, १२ला गोरेगाव, १३ ला चांगेफळ, १४ डाबकी, १५ ला भौरद घटस्थापनेच्या दिवशी या पंधरवड्याच्या समारोप करण्यात आला. या उपक्रमाला शेतकरी, शेतमजूर , कामगार , बेरोजगार युवक युवती, महिला , व्यापारी व गावकरी यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे . हा पंधरवाडा यशस्वी करण्याकरता गावागावातील सरपंच, उपसरपंच,शेतकरी, युवक, सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. त्याबद्दल भारत राष्ट्र समितीचे अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक गजानन हरणे यांनी सर्व प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्याचे मनापासून आभार मानले व त्यांना धन्यवाद दीले. प्रकाशनार्थ..........................
0 Comments