Ticker

6/recent/ticker-posts

रिलायन्स हॉस्पिटल कॅन्सर केअर अकोला यांच्यातर्फे जिल्हा सामान्य रुग्णालय वाशीम येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

वाशिम जिल्ह्यातील नागरिकांसाठी सुवर्णसंधी दिनांक 27/10/ 2023 रोजी रिलायन्स हॉस्पिटल तर्फे जिल्हा सामान्य रुग्णालय वाशीम येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत ठेवण्यात आलेले आहे. या शिबिरामध्ये येणाऱ्या रुग्णांची तपासणी व तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येणार आहे. तरीदेखील खालील लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी आपली तपासणी मोफत करून घ्यावी. महिला रुग्णांनी खालील लक्षणे असल्या शिबिरात स्वतः येऊन तपासणी करून घ्यावी. लक्षणे 1) स्तनामध्ये गुठळ्या किंवा गाठ असणे 2) स्थानामध्ये रक्तस्त्राव पांढरे पाणी बाहेर पडणे 3) स्थानाच्या त्वचेमधील बदल 4) काखेत येणारी गाठ 5) स्तनाच्या आकारांमधील अकस्मात बदल 6) संबंध ठेवल्यानंतर होणाऱ्या वेदना होणे 7) संबंध ठेवल्यानंतर रक्त रस्ता होणे 8) लघवी करताना दुर्गंधी येणे 9) मेनोपॉज नंतर होणारा त्रास  10) रक्तस्त्रावास सह डिस्चार्ज  तसेच तोंड आणि दाता संबंधी आजार जसे 1) तोंडातून रक्त येणे 2) तोंडातील दोन ते तीन आठवडे न भरणारी जखम 3) घास गिळताना वेदना होणे 4) नियमितपणे वजन कमी होणे 5) तोंडामधील जखम असणे 6) कर्कश्य आवाज येणे  7) तोंडामध्ये दुर्गंध येणे 8) गळ्यामध्ये गाठ जाणवणे 9) जीभ आणि तोंडावर पांढरा भुरा आणि लाल रंगाचा डाग असणे 10) हिरड्यातून रक्त येणे इत्यादी  तरी या शिबिरामध्ये जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आव्हान हॉस्पिटल प्रशासनातर्फे करण्यात आले आहे शिबिरासंबंधी अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर 73 0453 65 48 या क्रमांकावर संपर्क साधा असे कळविण्यात येत आहे रिलायन्स हॉस्पिटल कॅन्सर केअर अकोला येथे अद्यावत रेडिएशन थेरपी तसेच केमोथेरपी उपलब्ध आहे तसेच आयुष्यमान भारत योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना देखील उपलब्ध आहे.

Post a Comment

0 Comments