Ticker

6/recent/ticker-posts

काजळेश्वर सर्कल आढावा बैठक संपन्न,शेकडो युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

कारंजा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण सर्व सामान्यांना अवगत व्हावे व मा.अजितदादा पवार साहेब यांचे विकासात्मक विचारधारा सर्वश्रुत व्हावी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्ष संघटन मजबूत व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो युसुफसेठ पुंजानी यांचे अध्यक्षतेखाली दिनांक-१६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७.०० वाजता काजळेश्वर सर्कल आढावा बैठकीचे आयोजन ग्राम काजळेश्वर येथे करण्यात आले.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून दत्तराज डहाके माजी नगराध्यक्ष नप कारंजा,जयकीसन राठोड माजी सभापती जिप वाशिम उपस्थित होते,तर अशोक डोंगरदिवे समाजकल्याण सभापती जिप वाशिम,प्रदीप देशमुख सभापती पं. स.कारंजा, अड  मिलिंद खंडारे,नितिन पाटील उपाध्ये सरपंच ग्राप काजळेश्वर,रांका तालुकाध्यक्ष  अमोल ठाकरे,ता.उपाध्यक्ष मुजमिल सोनू,उपसरपंच तहेसीन मुल्लाजी,तमूअ सुभाष उपाध्ये, खविसं  विनोद उपाध्ये,सेवा सह अध्यक्ष  सुभाष उपाध्ये, उपाध्यक्ष शेख मुजाक्कीर,माजी सरपंच डा बरकत,निसारोद्दीन मुल्लाजी,कल्लूभाई,जम्मू भाई,गजानन फड,हर्षल उपाध्ये, पत्रकार अशोक उपाध्ये,एकनाथ तिडके,शरफोद्दीन मास्टर,शेख मुजमिल,हसनभाई,ग्राम जानोरी सरपंच आशिष भिंगारे,पप्पू खंडागळे,आदी प्रामुख्याने उपस्थित होते.या प्रसंगी वंचीत बहुजन आघाडी ग्रा.प. पलाना सरपंच पवन विनायक गोपकर,उपसरपंच मुजफ्फर भाई,रहमत खा,सय्यद हसन,वसीम खा,मोहसीन खान,ओसामा भाई,अजहर भाई,सोनू शोएब,प्रशांत तिडके,साजन डाहाने,दिनेश उपाध्ये आदींनी मा.अजितदादा पवार यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.यावेळी आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments