कोपरखैरणे, नवी मुंबई.
वार्ताहर : अनंतराज गायकवाड
कोपरखैरणे रेल्वे स्थानक पश्चिम दिशेस सकाळ व संध्याकाळच्या प्रवाशांच्या गर्दीच्या ठराविक वेळेत फळ विक्री, ज्यूस विक्री, मोबाईलचे सामान विकणारे तसेच बॅग, सॉफ्ट टॉईज तसेच भाजी विक्री करणारे काही फेरीवाले आपले बस्तान मांडून बसत आहेत. सिडको ने ना फेरीवाला क्षेत्र घोषित करून देखील फेरीवाले आपले धंदे करीत आहेत अशा फेरीवाल्यांना सिडकोचे सुरक्षारक्षकच अभय देत आहेत की काय? असा थेट सवाल स्थानिक लोकप्रतिनिधी द्वारे केला जात आहे, तसेच कोपरखैरणे रेल्वे स्थानक आरपीएफ विभाग देखील यात सामील आहे की काय? अशी चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये होत असल्याने याची चौकशी व्हावी व फेरीवाल्यांना हटविण्यात यावे, अन्यथा अधिकृतरित्या स्थानिक बेरोजगारांना येथे लघुउद्योग करण्यास परवानगी द्यावी असे संभाजी ब्रिगेड नवी मुंबई कार्यकारणी द्वारे सिडको प्रशासनास सूचित करण्यात येत आहे.
या आशयाचे पत्र नुकतेच सिडको प्रशासनास जिल्हाध्यक्ष शिवश्री मारुतीराव खुटवड यांचे नेतृत्वात संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाच्या वतीने संबंधित अतिक्रमण विभागास देण्यात आले
याप्रसंगी शिवश्री कुणाल लवांडे, शिवश्री. राजेंद्र यादव
शिवश्री प्रदीप घारगे, शिवश्री दादा लादे, शिवश्री महेश, शिवमती सुनिता संकपाळ, शिवमती सरिता खन्ना यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच या प्रकरणी प्रसार माध्यमांनी देखील बातम्या प्रसारित केल्या होत्या परंतु सिडको प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने या विषयास गांभीर्याने घेऊन तोडगा काढावा. अन्यथा या विरोधात संभाजी ब्रिगेड तीव्र छेडले जाईल असे वर्तविण्यात आले.
_" मुंबई परिसरातून येणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांना हटविण्यात यावे, अन्यथा अधिकृतरित्या स्थानिक बेरोजगारांना येथे लघुउद्योग करण्यास परवानगी द्यावी"_
संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष मारुतीराव खुटवड
0 Comments